जालना : प्रत्येक माध्यम संस्थेचा पत्रकार हा आत्मा असतो. बातमी मिळवण्यासाठी पत्रकाराची नेहमीच धडपड असते. त्यामुळे त्याचे आपल्या आरोग्याकरे कडे नेहमीच दुर्लक्ष होते. हीच बाब लक्षात घेऊन जालना शहरातील संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होते. या शिबिरात तब्बल 30 पत्रकारांनी सहा वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य तपासण्या केल्या आहेत.
advertisement
या आरोग्य तपासणी शिबिरात कोणकोणत्या महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या आणि या आरोग्य तपासणी शिबिराचा उद्देश काय होता, याबाबत लोकल18 च्या टीमने आढावा घेतला.
प्रत्येक घटनेची माहिती आपल्यापर्यंत योग्य आणि वेळेत पोहोचवण्याचं काम पत्रकार आणि माध्यम संस्था करत असतात. मात्र, जमिनीवर काम करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. बातमी मिळवण्याच्या धडपडीत पत्रकार ऊन, वारा, पाऊस सहन करीत सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करत असतात. समाज स्वास्थ्य सदृढ ठेवण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांचे आरोग्य मात्र धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळते.
कौतुकास्पद! 58 वर्षांची महिला झाली बारावी पास, पुण्यातल्या मावळमधील प्रेरणादायी कहाणी
हीच बाब लक्षात घेऊन संजीवनी मल्टीस्पेटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. बळीराम बागल यांनी या विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जालना शहरात केले होते. या शिबिराला पत्रकारांचा उदंड प्रतिसाद लाभला. तब्बल 30 पत्रकारांनी सहा वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या या आरोग्य तपासणी शिबिरात करून घेतल्या. यामध्ये ईसीजी,ब्लड, शुगर, कोलेस्टेरॉल यासारख्या महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. पत्रकारांचं आरोग्य सुदृढ राहावे, हा या आरोग्य तपासणी शिबिराचा उद्देश असल्याचे डॉ. बळीराम बागल यांनी सांगितले.
महिलांसाठी पोस्ट ऑफिसची ही योजना म्हणजे एकदम भारी, कमी पैशात मिळणार तब्बल इतकं व्याज
डॉ. बळीराम बागल यांनी आयोजित केलेल्या या आरोग्य तपासणी शिबिरात मी माझ्या 6 प्रकारच्या आरोग्य तपासण्या करून घेतल्या आहेत. यामध्ये रक्त तपासणी. कोलेस्टेरॉल तपासणी. पांढऱ्या रक्तपेशींची तपासणी. अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. तसेच वैयक्तिक पातळीवर डॉक्टरांनी प्रत्येक पत्रकाराला मार्गदर्शन केले. अशाप्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम यापुढे देखील सुरू राहायलाच हवेत, असे पत्रकार संजय देशमुख यांनी सांगितले.
पत्रकार हा सर्व समाजाची काळजी करतो. मात्र, पत्रकाराची काळजी करण्यास कोणीही तयार नाही. पण डॉ. बळीराम बागल यांनी पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्नाला महत्त्व देते हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत, अशी भावना पत्रकार साहिल पाटील यांनी व्यक्त केली.