TRENDING:

पगार काढून देतो 5 हजार द्या, वैद्यकीय अधिकाऱ्याला मागितली लाच, असा अडकला ACB च्या जाळ्यात

Last Updated:

पाच हजारांची लाच मागणारा वरिष्ठ सहायक लाचेची 4000 रुपये रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना : भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणे दररोज समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. जालन्यात एका आरोग्य अधिकाऱ्याला सात दिवसांचा थकलेला पगार काढून देण्यासाठी पाच हजारांची लाच मागणारा वरिष्ठ सहायक लाचेची 4000 रुपये रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
लाच
लाच
advertisement

जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांत लाच मागणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया वाढल्या आहेत. सजग झालेले नागरिक एसीबीकडे तक्रार करत असून यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चांगलाच वचक निर्माण झाला आहे. तरीदेखील जिल्ह्यातील भ्रष्टाचार कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईतील 'या' मार्केटमध्ये फक्त दोनशेपासून मिळतायत लेडीज स्पेशल आऊटफिट्स, एकदा नक्कीच भेट द्या...

advertisement

सोमवारी लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या सहकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे थकलेले सात दिवसांचे वेतन काढण्यासाठी आरोग्य विभागात गेले असता वरिष्ठ सहायक वर्ग 3 सुनील काशिनाथ खंदाडे वय 54 वर्ष याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात पुन्हा झाली वाढ, सोयाबीन आणि कांद्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी जालना यांच्याकडे लेखी तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यावर जिल्हा परिषद कार्यालयातील वरिष्ठ सहायकाच्या दालनात ठरलेली रक्कम देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी गेले असता लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीस ताब्यात घेतले. अंगझडतीत लाचेची 4000 रकमेसह सातशे रुपये रोख आणि रेडमी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरोधात कदीम जालना पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
पगार काढून देतो 5 हजार द्या, वैद्यकीय अधिकाऱ्याला मागितली लाच, असा अडकला ACB च्या जाळ्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल