जालना : मिरची हा भारतीय घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक मसाल्याच्या पदार्थांपैकी एक पदार्थ आहे. आपल्या घरातील जीवनाची लज्जत वाढवणारा व चवीला अतिशय तिखट असणाऱ्या या मिरचीने मात्र, जालन्यातील एका शेतकऱ्याच्या जीवनाची गोडी वाढवली आहे. या शेतकऱ्याने केवळ 30 गुंठे क्षेत्रावरील मिरची उत्पन्नातून तब्बल चार लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळवले आहे. त्यांनी मिरची लागवडीचे नियोजन कसे केले हे, जाणून घेऊयात.
advertisement
केशव शिरसाठ असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते जालना जिल्ह्यातील जळगाव येथील रहिवासी आहेत. त्यांनी केवळ 30 गुंठे क्षेत्रावरील मिरची उत्पन्नातून तब्बल 4 लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळवले. केवळ 30 गुंठे असलेल्या मिरची क्षेत्रावर त्यांना तब्बल 120 क्विंटल मिरचीचे उत्पन्न झाले आहे.
केशव शिरसाट यांनी नातेवाईकाच्या सांगण्यावरून 30 गुंठे क्षेत्रावर मिरची लागवडीचा निर्णय घेतला. दिवाळी झाल्यानंतर 15 दिवसांनी त्यांनी आपल्या 30 गुंठे क्षेत्रावर मिरची लागवडीसाठी मल्चिंग पेपर आणि ठिबक अंथरण्यास सुरुवात केली. वाटुर येथून मिरचीची रोपी खरेदी केली. त्यानंतर घरातील सदस्यांच्या सहाय्याने मिरची लोकांची लागवड केली. लागवडीनंतर 3 महिन्यानंतर रोपांना मिरच्या लगडण्यास सुरुवात झाली. पहिला तोडा हा 3 क्विंटलच्या आसपास निघाला. यानंतर प्रत्येक थोड्या वेळी उत्पन्नात वाढ होत गेली. 3 क्विंटलपासून हा तोडा जवळापस 20 क्विंटलपर्यंत गेला.
वडापाव अन् बर्गरचं अनोखं कॉम्बिनेशन, दादरमधील युनिक बडापाव स्टेशनची सर्वत्र चर्चा, हे आहे लोकेशन
आतापर्यंत तब्बल 120 क्विंटल मिरचीची विक्री त्यांनी केली आहे. तसेच या मिरचीला 45 रुपये प्रति किलोपासून ते 60 रुपये प्रति किलो इतका भाव मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी या मिरची विक्रीतून साडेपाच लाखांचे उत्पन्न कमावले आहे. तसेच दीड लाख रुपये खर्च वजा केल्यास 4 लाखांचं निव्वळ उत्पन्न झाले आहे. यासोबतच त्यांना आणखी 50 क्विंटल मिरचीचे उत्पन्न अपेक्षित आहे.
सर्व शेतकऱ्यांनी शेतामध्ये मेहनत केल्यास व कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता कष्ट केले तर चांगले उत्पन्न हमखास मिळते. मिरची लागवडीतून चांगले उत्पन्न शेतकरी घेऊ शकतात. सगळ्यांनी या क्षेत्राकडे वळावं, असे आवाहन शेतकरी किशोर शिरसाठ यांनी केले आहे.