जालना शहरातील हरिओमनगर भागातील प्रा. श्रीकांत चिंचखेडकर यांनी गणेशोत्सव कालावधीत स्वतःच्या घरीच पर्यावरणपूरक देखावे तयार करण्याची परंपरा 19 व्या वर्षीही कायम ठेवली. प्रा. चिंचखेडकर यांनी यावर्षी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशातील राज्यनिहाय देवदेवता, आराध्य दैवतांचा देखावा तयार केला. त्यांनी विविधतेतून एकतेचा संदेश देणारा देखावा सादर केला असून, हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
advertisement
काय सांगता! जालन्यातील गणेश मंडळानं बनवली 101 किलो चांदीची मूर्ती, Video
पर्यावरणपुरक गणेशोत्सव
प्रा. श्रीकांत चिंचखेडकर हे पर्यावरणपूरक कापूस, शाडू माती, पुठ्ठा, कागदी लगदा, गोनपाट, बांबू खळ यांचा वापर करून दरवर्षी देखावे तयार करतात. महाराष्ट्रातील सिद्धिविनायक मध्यप्रदेशातील पशुपतीनाथ, आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी, दिल्ली येथील स्वामी नारायण भगवान गुजरात येथील द्वारकाधीश, केरळ येथील पद्मनाभस्वामी, आसामची कामाख्या देवी, तामीळनाडूतील भगवान मुरुगन, मणिपूरचा महाबली हनुमान ठाकूर, ओडिशातील जगन्नाथधाम, उत्तराखंडमधील केदारनाथ, हरयाणाची मनसा देवी, उत्तर प्रदेशातील रामलल्ला बिहारचे भगवान महावीर, पंजाबमधील गुरुनानक देव, राजस्थानमधील सालासर बालाजी, हिमाचल प्रदेशमधील चामुण्डा देवी, पश्चिम बंगालची कालीमाता, जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी आदी देवता मूर्ती स्वरूपात या देखाव्याच्या माध्यमातून साकारल्या आहेत.
एक गाव एक नव्हे तर 11 गावांमध्ये आहे एकच गणपती! पाहा कुठं आहे ही परंपरा?
भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी हा उद्देश
आजवर जागृत स्त्रीशक्ती (सर्व अपरिचित देवी), अमृतसरचे सुवर्ण मंदिर, गुजरात स्वामीनारायण मंदिर, स्वामी विवेकानंद स्मारक, संतमेळा, दशावतार, श्री विश्वरूप दर्शनसह कृष्णलीला, नाशिकचे काळाराम मंदिर, साडेतीन शक्तीपीठे, अष्टविनायक मंदिरे, श्रीक्षेत्र शेगावच्या आनंदसागरचे प्रवेशद्वार, गतवर्षी महादेवाचे नऊ अवतार आणि यावर्षी विविधतेतून एकता निर्जीव देखावा सादर केला आहे. त्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागला. प्रत्येकाला भारतीय संस्कृतीची ओळलेला व्हावी, एखाद्या गोष्टीतून नवनवीन संकल्पना मांडाव्यात आणि पर्यावरणाचा संदेश देणे, हा आपला मुख्य उद्देश आहे असं प्राध्यापक चिंचखेडकर यांनी सांगितले.