TRENDING:

जरांगेंचं उपोषण सुरू असतानाच लक्ष्मण हाके आज करणार मोठी घोषणा, अंतरवालीत घडामोडींना वेग

Last Updated:

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत, त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र दुसरीकडे आता ओबीसी समाज देखील चांगलाच आक्रमक झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना, रवी जैस्वाल प्रतिनिधी : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं यावर अद्यापही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला ओबीसी समाजातून मोठा विरोध होत आहे.
News18
News18
advertisement

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आजपासून अंतरवाली सराटीच्या वेशीवर म्हणजे वडी गोद्रीत उपोषण करणार आहेत. सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन हाके उपोषणाबाबत घोषणा करणार आहेत.

सगे सोयरे शब्दाची अमंलबजावणी करू नये, बोगस नोंदीद्वारे देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करा अशा विविध मागण्यांसह हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषण करणार आहेत.  अंतरवालीच्या वेशीवर यापूर्वी मंगेश ससाणे यांचंही उपोषण सुरु आहे. त्यामुळे आता मराठा, ओबीसी संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

advertisement

दुसरीकडे आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील सहव्यांदा उपोषणाला बसले आहेत. दोन चार दिवसात सरकारनं आमचा प्रश्न मार्गी लावावा. नसता फडणवीसांचे सगळे गणितं फेल करणार. मग आमच्या नावानं बोंबलत बसू नका, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी राज्य सरकारला दिला आहे. अंबडचे तहसीलदार सोडता अद्याप सरकारच्या एकाही प्रतिनिधीने जरांगे पाटील यांची भेट घेतलेली नाहीये.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
जरांगेंचं उपोषण सुरू असतानाच लक्ष्मण हाके आज करणार मोठी घोषणा, अंतरवालीत घडामोडींना वेग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल