गावातील हस्नूरबाई तुराब शहा (वय 75) यांना दुपारी चार वाजता अर्धांगवायूचा झटका आला. त्यांना तातडीने दवाखान्यात हलवणे आवश्यक होते. मात्र, नदीला पाणी असल्याने रुग्णवाहिकेला गावात पोहोचणे शक्य नव्हते. अशावेळी रुग्णास न्यायचे कसे, हा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला. क्षणाचाही विलंब न करता गावातील कुश जाधव, भूषण सोनवणे, अनिल वाल्डे, कृष्णा मस्के, विशाल वायकोस, अभिषेक जाधव, देवीदास तमखाने आणि सलीम शहा आदी तरुण पुढे सरसावले.
advertisement
Beed News: आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर, स्ट्रेचर नाही, रुग्णांना झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ
काम तत्काळ मार्गी लावण्याची मागणी
सध्या वालसा-खालसा येथे पावसाळ्याच्या काळात गावाबाहेर जाण्यासाठी कोणताही सुरक्षित मार्ग उपलब्ध नाही. कामानिमित्त केदारखेडा, भोकरदन आणि जालना येथे जाण्यासाठी पूर्णा नदी पार करणे अपरिहार्य आहे. परंतु नदीला पाणी वाढले की हा मार्ग पूर्णपणे बंद होतो. अशा वेळी ग्रामस्थांच्या लोकवर्गणी आणि तरुणांच्या पुढाकारातून उभारलेला तराफाच त्यांचा जीवनदायी आधार बनतो. नदीवरील मंजूर पुलाचे काम तत्काळ मार्गी लावून या रोजच्या संकटातून गावाची सुटका करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
लोकवर्गणीतून तयार केलेल्या तात्पुरत्या तराफ्यावर खाट ठेवून त्यांनी आजीबाईंना नदी पार करून सुरक्षितपणे दवाखान्यात हलवले. नदीतील पाणी, ढळणारा तराफा आणि आजारी अवस्थेतील वृद्ध महिलेची यातना पाहून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पुलाचे काम रखडल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमावावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त करत आहेत.






