जालना : खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सध्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुने सोयाबीन 3500 ते 4350 रुपये प्रति क्विंटल या दराने विकले जात आहे. बाजार समितीमध्ये दररोज 800 ते 1000 क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे.
देशांतर्गत बाजारात सोयाबीनची मागणी कमी झाल्याने सोयाबीनचे दर कमी झाल्याचं बाजारातील जाणकार सांगत आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि केंद्र सरकारचे धोरणे देखील सोयाबीन दरावर परिणाम करत आहेत. येत्या हंगामात सोयाबीन दराची स्थिती कशी राहील आणि सोयाबीन दर कमी होण्यामागे काय कारणे आहेत, याबाबतची माहिती बाजार विश्लेषक लक्ष्मीनारायण शर्मा यांनी दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, खरीप हंगामातील सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनकडून बऱ्याच अपेक्षा असतात. मात्र, सोयाबीनचे दर सध्या पडलेले असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यामुळेच नवीन येणाऱ्या सोयाबीनला चांगला दर मिळेल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे.
परदेशातील बाजार भारतीय बाजाराला अजिबात सपोर्ट करत नाही आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सोयाबीन मिल्समध्ये अजिबात मागणी नाही. सोयाबीन दर कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे केंद्रामध्ये असलेल्या सरकारने तेलावरती शून्य टक्के आयात कर लावला आहे. यामुळे देखील सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला आहे.
गर्भवती महिलांना मधुमेहाची समस्या, काय आहे यामागची कारण, नेमकी कशी काळजी घ्यावी, VIDEO
...तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल -
शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेऊन जर केंद्र सरकारने कच्च्या तेलावर आयात कर लावला तरच यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल. मागील 2 वर्षांपासून सोयाबीन तेल आणि भावामध्ये फारसा उठाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला देखील भाव मिळत नाही. तर दुसरीकडे ऑइल मिल वालेही काटकसर करुनच व्यवसाय करत आहेत. याचबरोबर सोयाबीनपासून निघणारे सर्वात महत्त्वाचं बायप्रॉडक्ट ते म्हणजे डीओसी मात्र याच सोया पिंडीला बाहेर देशांमध्ये फारशी मागणी नाही. त्यामुळेही सोयाबीनच्या दरावर परिणाम होत आहे.
देशांतर्गत बाजारात सोया मिल्सकडून असलेली कमी मागणी केंद्र सरकारचे धोरण, आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली कमी मागणी आणि सोयाबीन डिओसीला असलेली कमी डिमांड यामुळे सोयाबीनचे दर कमी झाल्याचे बाजार विश्लेषक लक्ष्मीनारायण शर्मा यांनी सांगितले. मात्र, येत्या काळात केंद्र शासनाने आपल्या धोरणात बदल केला आणि डीओसीला मागणी वाढल्यास सोयाबीनच्या दरात तेजी येऊ शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.