का झाली वाढ?
जालना शहरामध्ये महानगरपालिका झाल्यापासून रो हाऊसच्या विक्रीमध्ये चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे. ग्रामीण भागातले प्रत्येक लोकांचा असं आग्रह आहे की, आपण मुलांचे शिक्षणासाठी शहरांमध्ये राहिलं पाहिजे. त्यासाठी भरपूर कस्टमर असे ग्रामीण भागातूनच जास्त येत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मंठा आणि अंबड रोडला पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध असल्याने येथे घरांना चांगली मागणी आहे डी मार्ट असेल पोद्दादार आणि इतर चांगल्या शाळा असतील किंवा वेगवेगळे अत्याधुनिक हॉस्पिटल असतील यामुळे लोकांचा कल मंठा आणि अंबड रोडला अधिक आहे. यामुळे या दोन भागात घर घेण्यासाठी नागरिक सर्वाधिक पसंती देत आहेत, असं बांधकाम व्यावसायिक बंडू शेजुळ यांनी सांगितलं.
advertisement
जगात कुठेही काही घडलं तर भारतीय शेअर मार्केटमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये का बुडतात?
सध्याच्या दराबाबत बोलायचं झाल्यास मंठा रोडला टू बीएचके रो हाऊस घ्यायचे असल्यास 35 ते 40 लाख रुपये लागतात. तर अंबड रोडला हीच किंमत 30 ते 35 लाखांच्या दरम्यान आहे. दहा वर्षांपूर्वीचा दर लक्षात घेतल्यास प्लॉटचे दर कमी असल्यामुळे तसेच बांधकाम साहित्याचे दर देखील नियंत्रणात असल्यामुळे हेच रो हाऊस 15 ते 20 लाखांच्या आसपास ग्राहकांना मिळायचे. पाच-सहा वर्षांपूर्वी मंठा रोडला प्लॉटचे दर 800 ते 900 रुपये स्क्वेअर फुट च्या आसपास होते. मात्र सध्याच्या घडीला प्लॉटचे दर अडीच ते तीन हजार रुपये प्रति स्क्वेअर फुट एवढे वाढल्याने, तसेच बांधकाम साहित्याचे दर देखील वाढल्याने घरांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तरी देखील जालना शहरात पायाभूत सुविधा वाढत असल्याने नवीन घरांच्या मागणीत मोठी वाढ झाली असल्याचे शेजुळ यांनी सांगितले.
PHOTOS : रामपूरच्या नवाबाजवळ होती स्वत:ची रेल्वे, होती शाही व्यवस्था, जशी की 5 स्टार हॉटेलच
दसरा आणि दिवाळी तोंडावर असल्याने अनेक कुटुंबे हा मुहूर्त साधून आपला गृहप्रवेश करणार आहेत. शहरातील घरांच्या तुलनेत शहराच्या बाजूच्या परिसरात घरांचे दर तुलनेने कमी आहेत. शहरातील ट्राफिक व दगदग यामुळे देखील अनेक नागरिक शहरात घर न घेता शहराबाहेरील रस्त्याला घर घेण्यास पसंती देत आहेत त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोक देखील मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शहरात घर घेण्यास प्राधान्य देत आहे.