सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करु पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नांवर सरकारने पाणी फेरले, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच राज्य शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीत पैसे नसताना विविध कंत्राटांचे वाटप केले. आज थकलेली बिले घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना आणि आंदोलने करत आहेत. ही एका खात्याची परिस्थिती नसून, सर्वच खात्यांची परिस्थिती आहे, असे वास्तव जयंत पाटील यांनी सांगितले.
advertisement
एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंबे सुद्धा अवलंबून असतात, याचे सरकारला कसलेही भान राहिलेले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रमाणे कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरु होईल, अशी भीती मला वाटते. या परिस्थितीवर सरकारने तात्काळ तोडगा काढावा, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.
लाडकी बहीण योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पडल्याने सरकारची तारांबळ होत आहे. अनेक कंत्राटदारांनी कामे पूर्ण करूनही त्यांना वेळेत पैसे मिळत नाहीत, हे वास्तव आहे. अशाच एका कंत्राटदाराने शासन वेळेवर पैसे देत नसल्याचे सांगून आपले आयुष्य संपवले आहे. जल जीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे. शासन आमचे पैसे देत नाही, असे कारण सांगून तरूण कंत्राटदाराने आपले आयुष्य संपवले. बिले वेळेत मिळत नसल्याने, मानसिक त्रासाला कंटाळून स्वतःच्या शेतात गळफास घेऊन कंत्राटदाराने आत्महत्या केली.
वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील कंत्राटदार हर्षल पाटील (वय ३५) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. जल जीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करून देखील एक वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणातून त्याने जीवन संपवले.