जयंत पाटील यांच्या सातत्याने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत असतात. आता प्रवेश करणार, नंतर प्रवेश करणार असे सातत्याने बोलले जाते. अशा सगळ्या चर्चांचे जयंत पाटील वेळोवेळी खंडन करतात. आताही त्यांनी भाजमधल्या प्रवेशाविषयीच्या चर्चांचे खंडन केले.
जयंत पाटील म्हणाले, उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व साधारण बैठक बोलावली आहे. मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही. आमची पक्षाची सर्वसाधारण बैठक आहे. या बैठकीत पुढली मुद्द्यांवर चर्चा होईल.
advertisement
भाजपमधल्या प्रवेशाविषयी त्यांना विचारले असता, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला कुणी विचारलं नाही, ना मी कोणत्या नेत्याला भेटलो. या चर्चा माध्यमातूनच होत आहेत. माध्यमे आमच्या पेक्षा गतिमान झाले आहेत. मलाही एक मेसेज आला आहे. माझा सहकाऱ्याने मला तो मेसेज पाठवला. ही सूत्रे कुठे आहेत ती दाखवा, मला त्यांच्याकडे बघायचे आहे जरा. तुम्ही बातम्यांच्या बाबतीत इतके संवेदनशील आहात की कोणला भेटले तरी बातम्या करता, पराचा कावळा करता. मी प्रत्येक गोष्टीला उत्तर देत नाही. कारण बातमी नंतर हवेत विरून जाते. भाजपने माझाशी काही संपर्क केलेला नाही. माझे भाजप नेत्यांनी चांगले संबध आहे. मुख्यमंत्र्यांना भेटलं की भाजपमध्ये चाललो असे नाही. मगाशी मी उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटलो. कुणाला तरी भेटलो म्हणून बातम्या करणं थांबायला हवं, असा सल्ला जयंत पाटील यांनी माध्यमांना दिला.
तुम्हाला मोदींच्या घोषणा अलीकडे आवडायला लागल्या आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यावर डीबीटी ही मोदींची घोषणा होती. त्यावर मी बोललो. मला त्यांच्या योजना आवडतात वगैरे असले काही नाही, असे जयंत पाटील म्हणाले.