जयंत पाटील यांचा राजीनामा
पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जयंत पाटील यांनी पायउतार होण्यातची विनंती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर केली. सात वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर, आता नव्या पिढीला संधी मिळायला हवी, अशी भूमिका पाटील यांनी मांडली होती. अशातच आता जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. रोहित पवार यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल का? अशी चर्चा देखील सुरू असताना आता शशिकांत शिंदे यांचं नाव समोर आलं आहे. शशिकांत शिंदे सध्या विधान परिषदेवर आमदार आहेत.
advertisement
मंगळवारी पदभार स्विकारण्याची शक्यता
राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकत्यांच्या विरोधामुळे जयंत पाटील यांना त्यांचे राजीनामास्त्र म्यान करावं लागलं. त्यावेळी जयंत पाटील यांनी राजीनामा दिला तर या पार्श्वभूमीवर 'राष्ट्रवादी'च्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री शशिकांत शिंदे, तसेच राजेश टोपे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आली होती. अशातच आता यामद्ये शशिकांत शिंदेंची सरशी झाली असून आता मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्विकारण्याची शक्यता आहे.
कोण आहेत शशिकांत शिंदे?
माथाडी कामगार नेते ते सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व गाजवणारे आमदार अशी शशिकांत शिंदे यांची कारकीर्द राहिली आहे. शशिकांत शिंदे हे जेष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. तर महेश शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले असल्याची देखील कुजबुज असते. 2009 मध्ये विधानसभा पुनर्रचना झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे या मतदारसंघातून विजयी झाले. 2014 ला देखील त्यांनी विजय मिळवला होता. 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीला शशिकांत शिंदे यांचा झालेला पराभव ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे या पराभवानंतर सुद्धा शशिकांत शिंदे यांना अनेक संधी शरद पवार यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये देखील त्यांना पुन्हा पराभवाला समोरं जावं लागलं होतं.