सल्ला मंडळातील ज्येष्ठांना महत्त्व
इस्लामपूर शहरात आमदार जयंत पाटील यांच्याविरोधी गटांनी विविध उपक्रमांतून शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) सध्या शांत दिसत आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत पक्षाला पुन्हा ताकद देण्यासाठी जयंत पाटील यांनी पाऊल उचलले आहे.
या नव्या सल्ला मंडळात ज्येष्ठ माजी नगराध्यक्ष बी. ए. पाटील, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि प्रा. शामराव पाटील यांचा समावेश करण्यात येणार आहे. ज्येष्ठांना सोबत घेऊन निवडणुकीची (Islampur politics) रणनीती अधिक मजबूत करण्याची जयंत पाटील यांची योजना आहे.
advertisement
इस्लामपूरसह आष्टा पालिकेच्या निवडणुकीची तयारीही सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत. याविषयी बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले की, "आगामी पालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचा अंतिम अधिकार आमदार जयंत पाटील यांच्याकडेच राहील, पण पक्षामधील ज्येष्ठांचा सल्ला घेतला जाईल."
हे ही वाचा : रेल्वेचा अजब कारभार! 'महालक्ष्मी' एक्स्प्रेसच्या प्रवाशांना बसणार मोठा फटका; प्रवासी संघटनांकडून आंदोलनाचा इशारा
हे ही वाचा : 'गोकुळ' दूध संघाची मोठी घोषणा! मुराबरांबरोबर आता मिळणार 'पंढरीपुरी' म्हशी, तर 'या' योजनेचाही होणार विस्तार