कल्याण पूर्वेतील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याच्या समस्यने त्रस्त आहे.कमी दाबाने, अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे विशेषतः महिला नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. नागरिक आणि विविध राजकीय पक्षांनी आंदोलनं, निवेदने आणि तक्रारींचा पाऊस पाडला तरी केडीएमसी प्रशासनाकडून आश्वासनांपलीकडे कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नाही. पण आता दिवाळी तोंडावर हा प्रश्न सुटण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली. या भूमिकेने अधिकाऱ्याची झोप उडाली आहे.
advertisement
मनसेचे उपशहर प्रमुख योगेश गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी
केडीएमसीच्या ड प्रभाग कार्यालयात धडक दिली. यावेळी मनसेच्या अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. पण अधिकारी जागेवरच नसल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला ‘चपलेचा हार’ घालत घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे.विषेश म्हणजे यावेळी मनसेने “पुढील सात दिवसांत दोन तासांचा मुबलक पाणी पुरवठा झाला नाही तर थेट आयुक्तांशी ‘पंगा’ घेऊस असा सूचक इशारा मनसेला दिला आहे.
“आम्ही सातत्याने अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहोत.मिळतात ते फक्त पोकळ आश्वासने. सत्ताधाऱ्यांच्या दबावानंतर काही ठिकाणी जास्त पाणी तर काही ठिकाणी अगदीच कमी पाणी दिलं जातंय. पाणी हा नागरिकांचा हक्क आहे. सात दिवसांत समस्या सुटली नाही तर थेट आयुक्तांवर मोर्चा काढू, असा इशारा मनसेचे उपशहर प्रमुख योगेश गव्हाणे यांनी दिला आहे. आता या इशाऱ्यानंतर केडीएमसी प्रशासन जागं होतं का… की पुढचा टप्पा ‘पंगा मोर्चा’ असेल? याकडे कल्याणकरांचे लक्ष लागले आहे.