सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबावर मध्यरात्री दहा ते बारा जणांनी हल्ला केला यात चार महिला जण जखमी आहेत. बीडच्या शिरूर तहसील कार्यालया गायरान जमिनीत हा हल्ला करण्यात आला आहे. आम्हाला न्याय मिळावा, अशी विनंती सरकारकडे केली आहे.
रात्री नेमकं काय घडलं?
तेजू भोसले म्हणाल्या, रात्री 10-11 वाजता आमच्यावर हल्ला झाला अगोदर एक स्विफ्ट आणि त्यानंतर एक स्कॉर्पिओ आली. गाडीतून 15-20 लोक खाली उतरल्यानंतर आम्हाला म्हणाले, पारध्यांनो तुम्ही इथे कशाला राहिला असं म्हणत आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करताना त्यांनी माझ्या लहान बहिणीचा हात ओढला आणि तिला ओढत घेऊन जायला निघाले. दरम्यान मी वाचवण्यासाठी गेले तर माझ्या डोक्यात कुऱ्हाड टाकली, त्यानंतर मी तसंच पोलिस स्टेशनला पळत गेले. परंतु पोलिसांनी मला मदत केली नाही.
advertisement
महिलांच्या डोक्यावर, पाठीत आणि पायांवर वार
हल्ला करणाऱ्याच्या हातात दांडगे, कोयते, कुऱ्हाडी होत्या अस पीडित व्यक्तींनी सांगितलं.या मारहाणीत महिला ही जखमी आहेत त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मारहाण कोणी केली अद्याप समोर आले नाही. जीव वाचवण्यासाठी महिलांनी मोठ्याने आरडाओरडा केला, मदतीसाठी किंकाळ्या फोडल्या, पण हल्लेखोरांनी मारहाण करणं सुरूच ठेवलं. त्यांनी थेट डोक्यावर, पाठीत आणि पायांवर वार केले. या हल्ल्यात सर्व महिलांना दुखापत झाली. या प्रकरणात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे..
कोण आहे सतीश उर्फ खोक्या भोसले?
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे आणि त्याची ओळख भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा सहकारी म्हणून आहे. सतीश भोसलेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.