TRENDING:

Kolhapuri Chappal : चक्क खिशात मावणारी कोल्हापुरी चप्पल, आता गाजवतीय मार्केट, काय आहे खास?

Last Updated:

चव्हाण बंधूंनी चक्क खिशात मावणारी कोल्हापुरी चप्पल बनवली आहे. अवघ्या 20 ग्रॅम वजनाच्या या चपलेची सध्या बाजारात जोरदार मागणी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : कोल्हापुरी चपलेचा रुबाब हा जगभरात प्रसिद्ध आहे. सुबक हस्तकला, पारंपारिक बाज आणि आकर्षक कलाकुसर यामुळे कोल्हापुरी चपलेची महती साता समुद्रापार पोहोचली आहे. काळ बदलला तशी कोल्हापुरी चपलेची रचना आणि प्रकारही बदलले. याच बदलाला स्वीकारत कोल्हापुरातील मडिलगे बुद्रुक गावातील चव्हाण बंधूंनी चक्क खिशात मावणारी कोल्हापुरी चप्पल बनवली आहे. अवघ्या 20 ग्रॅम वजनाच्या या चपलेची सध्या बाजारात जोरदार मागणी आहे. पारंपारिक रुबाब आणि आधुनिकतेचा संगम असलेली ही चप्पल कोल्हापुरी चपलेचा नवा ट्रेडमार्क ठरत आहे.
advertisement

चव्हाण बंधूंचा वडिलोपार्जित वारसा

कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील मडिलगे बुद्रुक गावात बाणाजी आणि धनाजी चव्हाण यांचा वडिलोपार्जित कोल्हापुरी चप्पल बनवण्याचा व्यवसाय आहे. चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी या व्यवसायाला नावारूपाला आणत आहे. गेल्या 40 वर्षांपासून मडिलगेची कोल्हापुरी या ब्रँडने देश-विदेशात आपली छाप पाडली आहे. अमेरिका, युरोपसह मुंबई, दिल्ली, बेंगलोर यासारख्या शहरांतील ग्राहक चव्हाण बंधूंकडून आपल्या आवडीप्रमाणे चपला बनवून घेतात. ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सिनेकलाकारांनी चव्हाण बंधूंच्या कोल्हापुरी चपला परिधान केल्या आहेत. या यशस्वी प्रवासात चव्हाण बंधूंनी ग्राहकांच्या मागणीनुसार सातत्याने नवनवीन प्रयोग केले. ग्राहकांकडून वारंवार हलक्या आणि सुबक चपलेची मागणी होत होती. यातूनच त्यांना खिशात मावणारी, प्रवासात हलकी आणि आकर्षक कोल्हापुरी चप्पल बनवण्याची संकल्पना सुचली.

advertisement

Success Story : आयटी क्षेत्रातील नोकरी सोडली, आता विकतायत पाणीपुरी, महिन्यासाठी अडीच लाख कमाई

20 ग्रॅम कोल्हापुरी चपलेची किमया...

चव्हाण बंधूंनी बनवलेली ही खिशात मावणारी कोल्हापुरी चप्पल अवघ्या 20 ग्रॅम वजनाची आहे. ही चप्पल बनवताना पारंपारिक कोल्हापुरी चपलेचा दर्जा आणि रुबाब कायम ठेवण्यात आला आहे. आकर्षक हस्तकला, टिकाऊ आणि दर्जेदार कमावलेलं चामडं आणि आरोग्याचा विचार करून ही चप्पल तयार केली जाते. या चपलेची निर्मिती प्रक्रिया किमान दहा दिवस चालते. चव्हाण बंधूंसह त्यांच्या पत्नी शुभांगी आणि शोभा चव्हाण याही या व्यवसायात सक्रिय सहभागी आहेत. शुभांगी आणि शोभा या हस्तकलेतील निपुणतेने चपलेवर आकर्षक वेण्या, गोंडे आणि इतर कलाकुसर करतात. ही चप्पल प्रवासात हलकी आणि टूरसाठी सर्वोत्तम आहे. कार टू कार्पेट अशी नवी ओळख निर्माण करणाऱ्या या चपलेची सध्या कोल्हापुरात जोरदार चर्चा आहे. 10 हजार ते 35 हजार रुपये किंमतीच्या या पॉकेट-साइज चपलेला ग्राहकांची पसंती मिळत आहे.

advertisement

दर्जेदार चामड्याचा वापर

सध्या बाजारात अनेक प्रकारच्या कोल्हापुरी चपला उपलब्ध आहेत; पण त्यांच्या दर्जाबाबत ग्राहकांच्या मनात शंका आहे. मात्र, मडिलगेच्या कोल्हापुरी चपलेची निर्मिती अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. या चपलेच्याकापशी कुरुंदवाडप्रकारात आकर्षक आणि सुबक सांबळ वापरलं जातं. खिशात मावणाऱ्या या चपलेच्या निर्मितीसाठी टिकाऊ आणि उच्च दर्जाचं कमावलेलं चामडं वापरलं जातं. चपलेच्या रचनेत दोन थर चामड्याचे आणि मध्यभागी स्पंजचा थर असतो. यामुळे चप्पल हलकी आणि आरामदायी होते. दर्शनी भागावर हाताने बनवलेल्या वेण्या आणि सुबक गोंड्यांमुळे ही चप्पल व्यक्तिमत्त्वाला साजेशी ठरते. या वैशिष्ट्यांमुळे ही चप्पल सध्या बाजारात भाव खात आहे.

advertisement

कौशल्यपूर्ण कारागिरांची कमतरता

चव्हाण बंधूंची तिसरी पिढी हा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहे; पण हस्तकलेत निपुण असलेल्या कारागिरांची कमतरता जाणवत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने या क्षेत्रातही शिरकाव केला आहे. त्याचबरोबर नव्या पिढीला ब्रँडेड सँडल आणि शूजची क्रेझ आहे. यामुळे पारंपारिक कोल्हापुरी चपलेकडे नव्या पिढीचं दुर्लक्ष होत आहे. परिणामी, या व्यवसायाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. नव्या पिढीने या व्यवसायात यावं यासाठी शासनाने विशेष योजना आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे, अशी मागणी चव्हाण कुटुंबीयांनी केली आहे.

advertisement

या खिशात मावणाऱ्या कोल्हापुरी चपलेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः प्रवासप्रेमी आणि पर्यटक यांच्यामध्ये ही चप्पल लोकप्रिय ठरत आहे. ही चप्पल हलकी, टिकाऊ आणि आकर्षक असल्याने ती परदेशी पर्यटकांनाही आवडते. चव्हाण बंधूंच्या या नव्या प्रयोगाने कोल्हापुरी चपलेचा वारसा तर जपलाच आहे, शिवाय आधुनिक गरजांनुसार त्यात नावीन्यही आणलं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
त्वचा सतत कोरडी पडते? आहारात समावेश करा हे तूप, दिसेल तजेलदार
सर्व पहा

चव्हाण बंधूंनी खिशात मावणाऱ्या कोल्हापुरी चपलेच्या माध्यमातून एक नवा इतिहास रचला आहे. या चपलेची मागणी वाढत असताना त्यांना उत्पादन वाढवण्यासाठी नव्या कारागिरांची आणि शासकीय पाठबळाची गरज आहे. कोल्हापुरी चपलेचा हा नवा अवतार निश्चितच कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि व्यावसायिक वारशाला नवं परिमाण देईल. या चपलेच्या यशाने कोल्हापूरच्या कारागिरांना आणि त्यांच्या कलेला पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर स्थान मिळालं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapuri Chappal : चक्क खिशात मावणारी कोल्हापुरी चप्पल, आता गाजवतीय मार्केट, काय आहे खास?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल