प्रशासनाने न्यायालयाचा 'हा' आदेश दाखवावा
कोल्हापूर महानगरपालिकेत उपायुक्त शिल्पा दरेकर आणि प्रदुषण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनावर अनेक आरोप केले. नदी प्रदुषणामुळे शासन आणि प्रशासन न्यायालयाचे आदेश पुढे करते पण भाविकांना गणेशमूर्ती पंचगंगेत विसर्जन करू नये यासाठी पंचगंगा नदीवर लोखंडी कठडे लावावेत, असा आदेश असल्याचं कुठेही दाखवलं जात नाही, असे मत हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी मांडले.
advertisement
वर्षभर होणाऱ्या प्रदुषणाकडे पालिकेचे दुर्लक्ष का?
महापालिका वर्षभर विविध मार्गांनी होणाऱ्या प्रदुषणाकडे दुर्लक्ष करते आणि गणेशोत्सवातच जागे होते. नाले, साखर कारखाने यांसारख्या विविध मार्गांनी प्रदुषण होत राहते. त्यावेळी महापालिका प्रशासन, प्रदुषण मंडळं आणि पुरोगामी कुठे असतात, पंचगंगा नदीत विविध मार्गांनी प्रदुषित झालेला पाणी नाल्यांच्या मार्गाने जात असते, त्यावेळी प्रशासन काय करते असा सवालही हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी बैठकीत उपस्थित केला. यावेळी पालिकेचे अधिकारी काहीही बोलू शकले नाहीत. यावेळी महापालिकेत शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांची भेट घेतली. ते म्हणाले की, "यंदाही गणेशभक्त, भाविक पंचगंगेतच श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतील", असे आश्वासन सर्वांना दिले.
हे ही वाचा : Toll-Free Travel : राज्य सरकारचा मोठा निर्णय, स्वातंत्र्यदिनी करा टोल फ्री प्रवास, या वाहनांना टोलमाफी जाहीर
हे ही वाचा : Ganpati Special Modi Express: गणपती स्पेशल ‘मोदी एक्स्प्रेस’; तिकीट, जेवण सगळंच FREE, बुकिंग कुठं?