TRENDING:

Kolhapur News: पंचगंगेची पातळी घटली, 30 बंधारे अजूनही पाण्याखाली; 4 लाखांचे नुकसान

Last Updated:

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या असल्या तरी, एकूणच पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी पावणे...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : शुक्रवारी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर दिवसभर अधूनमधून पाऊस सुरूच होता. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरणांमधून होणारा विसर्गही काही प्रमाणात कमी झाला आहे. राधानगरी धरणातून सध्या 1500 घनफूट प्रतिसेकंद, तर दूधगंगा धरणातून 4600 घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडले जात आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 24.03 फुटांवर असून, अजूनही 30 बंधारे पाण्याखाली आहेत.
Kolhapur News
Kolhapur News
advertisement

अलमट्टीतून 1 लाख 40 हजार घनफूट विसर्ग

विशेष म्हणजे, दिवसभरात पंचगंगा नदीची पाणी पातळी पावणे दोन फुटांनी घटली आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. गुरुवारी दिवसभर तुरळक सरी कोसळल्या, तर शुक्रवारी सकाळपासून संततधार रिपरिप सुरू होती. पावसामुळे नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. तसेच, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळी आणखी कमी होण्यास मदत होत आहे. सध्या धरणात 1 लाख 49 हजार घनफूट प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे, तर 1 लाख 40 हजार घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा आणि भुदरगड तालुक्यांमध्ये तुलनेने जास्त पाऊस झाला आहे.

advertisement

जिल्ह्यात 4 लाखांचे नुकसान

शुक्रवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात 13 खासगी मालमत्तांची पडझड झाली, यात अंदाजे 3 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरू लागले असले तरी, एसटीचे दोन मार्ग अजूनही बंद आहेत. शिरढोण ते कुरुंदवाड आणि जमखंडी ते कुडची या मार्गांवर एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.

advertisement

हे ही वाचा : महाराष्ट्रातील असं एक संस्थान, जिथे दिला जातो निराधारांना आधार, होतकरू मुलांनाही शिक्षणासाठी केली जाते मदत, Video

हे ही वाचा : Morning Habits : सकाळी उठून लगेच चहा पिताय? रिकाम्या पोटी चहा पिण्याने होईल नुकसान, डॉक्टरांनी दिला इशारा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur News: पंचगंगेची पातळी घटली, 30 बंधारे अजूनही पाण्याखाली; 4 लाखांचे नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल