TRENDING:

कोल्हापूर ते नागपूर आता थेट हवाई प्रवास, हैद्राबात, बंगळूर फक्त काही तासांत, पाहा वेळापत्रक

Last Updated:

Kolhapur News: कोल्हापूर आता नागपूर, हैदराबाद आणि बंगळुरूसारख्या महत्त्वाच्या शहरांशी हवाई मार्गाने जोडले गेले आहे. आता थेट विमानसेवा सुरू झालीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर: कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोल्हापूरला थेट राज्याच्या उपराजधानीशी जोडणारी कोल्हापूर-नागपूर विमानसेवा गुरुवारी सुरू झाली. स्टार एअरवेज कंपनीने ही सेवा सुरू केली असून, यामुळे कोल्हापूरचा उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. याशिवाय, कोल्हापूर-हैदराबाद आणि कोल्हापूर-बंगळुरू या मार्गांवरही आज, 16 मे पासून नव्या विमानसेवा सुरू होत आहेत.
कोल्हापूर ते नागपूर आता थेट हवाई प्रवास, हैद्राबात, बंगळूर फक्त काही तासांत, पाहा वेळापत्रक
कोल्हापूर ते नागपूर आता थेट हवाई प्रवास, हैद्राबात, बंगळूर फक्त काही तासांत, पाहा वेळापत्रक
advertisement

कोल्हापूर-नागपूर विमानसेवेचे तपशील

कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर ही विमानसेवा आठवड्यातील पाच दिवस - मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार - उपलब्ध असेल. या सेवेत 12 बिझनेस क्लास आणि 64 इकोनॉमी क्लास अशी एकूण 76 आसनांची व्यवस्था आहे.

वेळापत्रक पुढीलप्रमाणे:

नागपूर ते कोल्हापूर: सकाळी 10:00 वाजता उड्डाण, सकाळी 11:30 वाजता कोल्हापुरात आगमन.

कोल्हापूर ते नागपूर: दुपारी 12:00 वाजता उड्डाण, दुपारी 1:30 वाजता नागपूरमध्ये आगमन.

advertisement

या सेवेमुळे कोल्हापूर आणि नागपूरमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. तसेच, दोन्ही शहरांमधील व्यापारी, व्यावसायिक आणि पर्यटकांना याचा मोठा फायदा होईल.

Rain Alert: राज्यात वादळी पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, 27 जिल्ह्यांना झोडपणार

कोल्हापूर-हैदराबाद आणि कोल्हापूर-बंगळुरू सेवाही सुरू

कोल्हापूर-हैदराबाद आणि कोल्हापूर-बंगळुरू या मार्गांवरील विमानसेवाही शुक्रवारपासून सुरू होत आहेत. या सेवा मंगळवार, बुधवार आणि रविवारी उपलब्ध असतील.

advertisement

वेळापत्रक खालीलप्रमाणे

कोल्हापूर-हैदराबाद

हैदराबाद ते कोल्हापूर: सकाळी 9:35 वाजता उड्डाण, सकाळी 10:40 वाजता कोल्हापुरात आगमन.

कोल्हापूर ते हैदराबाद: दुपारी 3:00 वाजता उड्डाण, दुपारी 4:05 वाजता हैदराबादमध्ये आगमन.

कोल्हापूर-बंगळुरू

कोल्हापूर ते बंगळुरू: सकाळी 11:05 वाजता उड्डाण, दुपारी 12:35 वाजता बंगळुरूमध्ये आगमन.

बंगळुरू ते कोल्हापूर: दुपारी 1:05 वाजता उड्डाण, दुपारी 2:35 वाजता कोल्हापुरात आगमन.

advertisement

कोल्हापूरसाठी महत्त्वाचे पाऊल

या नव्या विमानसेवांमुळे कोल्हापूर आता नागपूर, हैदराबाद आणि बंगळुरूसारख्या महत्त्वाच्या शहरांशी हवाई मार्गाने जोडले गेले आहे. कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहे. येथील साखर उद्योग, वस्त्रोद्योग आणि पर्यटन क्षेत्राला या सेवांचा मोठा फायदा होईल. तसेच, कोल्हापूरच्या विमानतळाचा वापर वाढल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

advertisement

स्थानिकांना सोयीस्कर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात गाईचे तूप आरोग्यासाठी फायदेशीर, त्वचा राहील तजेलदार,आणखी हे फायदे पाहा
सर्व पहा

या विमानसेवांच्या घोषणेनंतर कोल्हापूरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक व्यापारी आणि प्रवासी यांनी या सेवांचे स्वागत केले आहे. स्टार एअरवेजचे योगदानस्टार एअरवेजने कोल्हापूरसारख्या मध्यम आकाराच्या शहरांना देशातील प्रमुख शहरांशी जोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कंपनीच्या या प्रयत्नांमुळे कोल्हापूरचा विकास आणि कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे. येत्या काळात आणखी काही मार्गांवर विमानसेवा सुरू होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.कोल्हापूरच्या नागरिकांनी या नव्या विमानसेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन स्टार एअरवेजने केले आहे. बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्टार एअरवेजच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूर ते नागपूर आता थेट हवाई प्रवास, हैद्राबात, बंगळूर फक्त काही तासांत, पाहा वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल