शेळ्या चारायला गेले होते, बिबट्याच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
शेळ्या चारायला गेलेल्या कोल्हापूरच्या दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे.
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी, कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील परळीनिनाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेळ्या चारण्यासाठी गेलेले निनो कंक (वय ७०) आणि त्यांची पत्नी रखुबाई कंक (वय ६५) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेनंतर रखुबाई यांचा मृतदेह गंभीर अवस्थेत सापडला असून त्यांचा एक हात आणि एक पाय गायब असल्याचे समजते. तर निनो कंक यांचा मृतदेह जवळच्या पाणवठ्यात आढळला आहे. घटनास्थळी दोन शेळ्याही बेपत्ता असल्याने बिबट्यानेच हा हल्ला केल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर परळीनिनाई आणि आसपासच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये संताप आणि अस्वस्थता आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. परिसरात सापळे लावण्यात आले असून बिबट्याचा शोध सुरू आहे.
advertisement
शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या दाम्पत्यावर असा प्राणघातक हल्ला झाल्याने ग्रामीण भागात वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
October 19, 2025 6:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेळ्या चारायला गेले होते, बिबट्याच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू