TRENDING:

नववर्षाच्या स्वागताला बांधा कोल्हापुरी फेटा, पाहा अगदी सोपी पद्धत, Video

Last Updated:

कोल्हापुरात वर्षानुवर्षे फेटे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मुजीब रंग्रेज यांनी कोल्हापुरी फेटा बांधण्याची सोपी पद्धत सांगितली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : मराठमोळी संस्कृती म्हटलं की इतर गोष्टींसोबतच कोल्हापुरी फेटा आठवतो. महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरी एखादा तरी फेटा असतोच. मात्र हा फेटा डोक्याला बांधायचा कसा? हे बऱ्याच जणांना माहीत नसते. कारण फेटा बांधणे ही एक कलाच असून ती प्रत्येकाला अवगत असतेच असे नाही. त्यामुळेच आपण सणासुदीला देखील हा फेटा डोक्यावर चढवू शकत नाही. म्हणूनच कोल्हापुरात वर्षानुवर्षे फेटे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मुजीब रंग्रेज यांनी फेटा बांधण्याची सोपी पद्धत सांगितली आहे.

advertisement

कोल्हापुरात बिंदू चौक परिसरात छत्रपती शाहू फेटे या नावाने मुजीब रंग्रेज यांचे फेट्यांचे दुकान आहे. फेटे विक्रीचा हा त्यांचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय असून सध्याची ही त्यांची पाचवी पिढी व्यवसाय सांभाळत आहे. विविध पद्धतींनी फेटा बांधण्याची कला मुजीब यांनी अवगत केली आहे. दुसऱ्याला फेटा बांधणे आणि कुणालाही वापरता येईल असा फेटा दुसऱ्याच्या डोक्यावर बांधून आणि शिवून तयार करणे अशा फेटा बांधण्याच्या दोन पद्धती मुजीब यांनी सांगितल्या आहेत.

advertisement

गुढीपाडवा का साजरा करतात? ही तीन कारणे तुम्हाला माहिती असायलाच हवी, Video

दुसऱ्याला कसा बांधावा फेटा?

1) दुसऱ्याला फेटा चढवताना आपण त्या व्यक्तीला एकतर मागून किंवा पुढून फेटा बांधू शकतो. सहसा पुढे उभे राहून फेटा बांधणे सोयीचे ठरू शकते. तसेच जर जुनाच फेटा बांधत असाल तर तो नीट इस्त्री करूनच घ्यावा.

advertisement

2) लग्नात मिळालेला, सत्करावेळी देण्यात आलेला फेटा साधारण 75 सेंटिमीटरच्या 5 फोल्डचा असतो.

3) समोरच्या व्यक्तीच्या डाव्या खांद्यावरुन साधारण 1 ते 2 फूट फेट्याची शेपूट सोडावी.

4) फेट्याचे दोन काठ एकाला एक जोडून घ्यायचे. डाव्या हाताची चार बोटे फेट्याखाली आणि अंगठा वरती अशा सैलसर मुठीमध्ये फेटा पकडावा.

5) डोक्याच्या मागून मध्यावरून पुढे कपाळाकडे फेटा घेऊन हात फिरवून पीळ मारत डोक्याभोवती एक फेरा करावा. अशाच पद्धतीने पाच फोल्डच्या फेट्याचे तीन पिळ करता येतात.

advertisement

6) फेट्याचे तीन पीळ पूर्ण झाल्यानंतर मागच्या बाजूला फेट्याची साधारण 4 इंचाची पट्टी तयार करून घ्यावी.

7) चार ते साडेचार इंचाची ही पट्टी पुढे कपाळावर फिरवून घेऊन तुऱ्याच्या ठिकाणी कोपरे फेट्याच्या आतमध्ये खोचावेत. शेवटी तुरा सोडून त्याला स्टेपलर पिन माराव्यात.

गुढीपाडव्याला सोनं मुहूर्तावर खरेदी करा, तरच होईल भरभराट! 'ही' वेळ चूकवू नका

कुणालाही चढवता येणारा फेटा कसा तयार करावा?

1) बांधलेला फेटा हा उचलून दुसऱ्याच्या डोक्यावर चढवता येण्यासाठी वेगळ्या पद्धतीने फेटा बांधावा लागतो. फेटा बांधून झाल्यानंतर तो धाग्याने शिवून घ्यावा लागतो.

2) त्यासाठी डोळ्याभोवती फेट्याचा पीळ मारतानाच फेट्याच्या प्रत्येक थरात आतमध्ये एक मोठा रद्दी कागद घडी करून घालावा. रद्दी पेपरमुळे फेट्याची जाडी आणि ताकद वाढते.

3) त्याचबरोबर पुढे तुऱ्याच्या भागाजवळ फेट्याच्या रंगाचा एक मोठा कागदाचा तुकडा घेऊन त्याचा वापर करावा. त्या कागदाच्या तुकड्याचा कोपरा दुमडून मागून फेट्याच्या आतल्या थरात घ्यावा.

4) तुरा आत खोवून शिल्लक कापड एका बाजूला खोचावे. शेवटी टाळू वरील कापडाने झाकून घ्यावा.

5) शेवटी सुई दोऱ्याने फेटा पिळांसह शिवून घ्यावा. यामध्ये तुऱ्याच्या जवळ आणि समोरच्या भागात व्यवस्थित रित्या शिवून घ्यावे.

6) दरम्यान असा फेटा घालताना दोन्ही कान फेट्याने झाकले जावेत. फेट्याचा सेंटर हा डाव्या डोळ्याच्या भुवईवर यावा. तसेच फेटाखाली उडताना पुढे आणि मागे धरुनच व्यवस्थित करावा.

दरम्यान, फेटा बांधणे याबरोबरच तो डोक्यावर सांभाळणे हे देखील आवश्यक आहे. म्हणूनच डोक्यावर स्थिर राहील असा फेटा या सोप्या पद्धतीने बांधणे शक्य होऊ शकते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
नववर्षाच्या स्वागताला बांधा कोल्हापुरी फेटा, पाहा अगदी सोपी पद्धत, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल