TRENDING:

आवाडे बापलेकाचा भाजपमध्ये प्रवेश, तिकीटही कन्फर्म, आता सुरेश हाळवणकर काय करणार? याकडे लक्ष

Last Updated:

Amit Shah Kolhapur Daura: आवाडे बापलेकांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : इतलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील महत्त्वाच्या नेते पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी रात्री ते संवाद साधणार आहेत. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात आवाडे बापलेकांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. इचलकरंजीमध्ये आवाडे यांचे पारंपारिक विरोधक म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते सुरेश हाळवणकर यांनाच आवाडेंना स्टेजवर आणण्याची जबाबदारी दिली गेली. हाळवणकर हे इचलकरंजीमधून विधानसभा निवडणुकीसाठी तीव्र इच्छुक आहेत.
आवाडे बापलेकाचा भाजपमध्ये प्रवेश
आवाडे बापलेकाचा भाजपमध्ये प्रवेश
advertisement

प्रकाश आवाडे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसची साथ सोडली. त्यांनी इचलकरंजीमधून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. जनतेने देखील त्यांना मतरुपी आशीर्वाद देऊन इचलकरंजीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. पुढील 5 वर्षे त्यांनी भाजपच्या भूमिकांशी सुसंगत निर्णय घेतले अर्थात भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही जवळीक वाढली. त्यामुळे ते शिंदे गटात प्रवेश करतील, असेही बोलले गेले.

advertisement

परंतु भारतीय जनता पक्षाला इचलकरंजीची जागा मिळणार असल्याचे निश्चित होताच त्यांनी पक्षप्रवेशासंबंधीची बोलणी सुरू केली. भाजपकडूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अखेर अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करण्याचा मुहूर्त साधला गेला. मंगळवारी दिवसभर मुंबईत तळ ठोकून त्यांनी उमेदवारीचा अंतिम शब्द शीर्षस्थ नेतृत्वाकडून घेतला. त्यामुळे काही दिवसांतच पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इचलकरंजीमधून भाजपकडून आवाडे रिंगणात असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

advertisement

आवाडेंचे परंपरागत विरोधक भाजपच्या सुरेश हाळवणकर यांच्या भूमिकेकडे लक्ष!

ज्या इचलकरंजीमध्ये आवाडे-हाळवणकर यांच्या संघर्षाची नेहमी चर्चा होत असे, तेच आवाडे आता भाजपमध्ये आल्याने सुरेश हाळवणकर काय करणार? विधानसभेला त्यांची भूमिका काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे आवाडे पिता पुत्रांना स्टेजवर येण्याची जबाबदारी हाळवणकर यांच्यावर सोपवली गेली.

आमदार आवाडे यांचे राजकीय कट्टर विरोधक म्हणून माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभा निवडणुकीला तेही इच्छुक आहेत. त्यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र, राहुल आवाडे हे उमेदवारीचा शब्द घेऊन आल्याची माहिती आहे. त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आवाडे पिता-पुत्र भाजपमध्ये आल्यास माजी आमदार सुरेश हाळवणकर हे कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
आवाडे बापलेकाचा भाजपमध्ये प्रवेश, तिकीटही कन्फर्म, आता सुरेश हाळवणकर काय करणार? याकडे लक्ष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल