एका कार्डावर तिन्ही सेवा
सध्या पीएमपी बससेवा आणि पुणे मेट्रोसाठी वेगवेगळी ॲप्स वापरावी लागतात किंवा वेगवेगळी तिकिटं घ्यावी लागतात. यामुळे प्रवाशांचा वेळ जातो आणि गैरसोयी निर्माण होतात. 2026 पर्यंत हिंजवडी-शिवाजीनगर हा नवीन मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. त्यावेळी अजून एका सेवेसाठी वेगळं तिकीट घ्यावं लागणार होतं. पण आता 'वन पुणे कार्ड'मुळे हा प्रश्न सुटणार आहे. एका कार्डवर बस, मेट्रो आणि भविष्यातील सर्व मार्गांवर तिकिट मिळणार आहे.
advertisement
तांत्रिक काम सुरू
या प्रणालीसाठी काही तांत्रिक अडचणी सोडवाव्या लागत आहेत. पीएमपी आणि महामेट्रो वेगवेगळ्या बँकांच्या पेमेंट गेटवेचा वापर करतात. त्यामुळे पैसे देण्याची प्रक्रिया एकत्र आणण्यासाठी तांत्रिक काम सुरू आहे. दोन्ही संस्थांनी ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंगची देवाणघेवाण सुरू केली आहे. लवकरच पीएमपीच्या ''आपली पीएमपीएमएल ॲप''वरून मेट्रोचं तिकीट काढता येईल. यासाठी दोन्ही यंत्रणांनी प्रणाली एकत्र करण्याचं काम सुरू केलं आहे. पुणेरी मेट्रोसोबतही प्राथमिक चर्चा झाली असून त्यांच्या सेवेतही ‘वन पुणे कार्ड’ सुरू करण्याची तयारी आहे.
प्रवाशांना होणार मोठा दिलासा
नवीन कार्ड सुरू झाल्यावर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरातील प्रवाशांना तिन्ही सेवांसाठी वेगवेगळे ॲप किंवा तिकीट वापरण्याची गरज नाही. एका कार्डवर बस आणि मेट्रो दोन्हींसाठी तिकीट मिळेल. यामुळे वेळ वाचेल आणि प्रवास सोपा होईल.
पुढील वर्षी सुविधा
महामेट्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीन मेट्रो मार्ग सुरू होण्यापूर्वी म्हणजेच पुढील वर्षभरातच ही सुविधा प्रत्यक्षात येणार आहे. महामेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितलं की, ही सेवा सुरू झाल्यावर प्रवाशांचा त्रास कमी होईल आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल.