मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत धीम्या मार्गावरील विद्याविहार, कांजूर मार्ग, नाहूर या रेल्वे स्टेशनचा थांबा रद्द करण्यात आला आहे. वेस्टर्न लाईनवर शनिवारी रात्रीच ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल.
बाप्पाच पावला! गणेशोत्सवानिमित्ताने 380 विशेष गाड्या, कुठे आणि कसं बुक करता येईल तिकीट?
advertisement
सेंट्रल लाईनवरील ब्लॉक कसा असेल?
रविवारी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. ठाणे येथून सकाळी 11.07 ते दुपारी 3.51 या कालावधीत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल, मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील.
ट्रान्स हार्बर लाईनवरील ब्लॉक कसा असेल?
रविवारी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत ठाणे ते वाशी/ नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉक सुरू असताना ठाणे ते वाशी/ नेरुळ स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहिल. ठाणे येथून सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 या कालावधीत सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल आणि पनवेल/नेरुळ / वाशी येथून सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल रद्द केल्या जातील.
वेस्टर्न लाईनवरील ब्लॉक कसा असेल?
शनिवारी रात्री 12 वाजून 30 मिनिटांपासून ते पहाटे 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत वसई रोड यार्डमध्ये ब्लॉक असेल. सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या दुरुस्तीसाठी वसई रोड यार्ड मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेमार्गावर ब्लॉक असेल.