शरद पवारांची एनसीपी खरी की अजित पवारांची एनसीपी खरी? हे 37 मतदारसंघातील निकालांवरून स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरूवातीपासून बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातच सर्वाधिक थेट लढती होताना दिसताहेत. अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार, हसन मुश्रीफ विरूद्ध समरजीत घाटगे, हर्षवर्धन पाटील विरूद्ध दत्तात्रय भरणे अशा तब्बल 38 लढतींमधून राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? याचा निकाल लागणार आहे. कोणती राष्ट्रवादी खरी, याचा फैसलाही आज राज्यातील जनता करणार आहे.
advertisement
शरद पवार विरुद्ध अजित पवार या मतदारसंघात लढत....
1 बारामती- युगेंद्र पवार (राष्ट्रवादी –एसपी)vsअजित पवार (राष्ट्रवादी)
2 तुमसर- चरण वाघमारे (राष्ट्रवादी –एसपी)vsराजू कारेमोरे (राष्ट्रवादी)
3 अहेरी- भाग्यश्री आत्राम (राष्ट्रवादी –एसपी)vsधर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)
4 पुसद- शरद मैंद (राष्ट्रवादी–एसपी)vsइंद्रनील नाईक (राष्ट्रवादी)
5 वसमत- जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी–एसपी)vsचंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी)
6 येवला- माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी–एसपी)vs छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
7 सिन्नर- उदय सांगळे (राष्ट्रवादी-एसपी)vsमाणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी)
8 दिंडोरी- सुनीता चारोसकर (राष्ट्रवादी–एसपी)vsनरहरी झिरवळ (राष्ट्रवादी)
9 शहापूर- पांडुरंग बरोरा (राष्ट्रवादी–एसपी)vsदौलत दरोडा (राष्ट्रवादी)
10 मुंब्रा कळवा- जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी–एसपी)vsनजीब मुल्ला (राष्ट्रवादी)
11 अणुशक्ती नगर- फहाद अहमद (राष्ट्रवादी –एसपी)vsसना मलिक (राष्ट्रवादी)
12 श्रीवर्धन- अनिल नवगणे (राष्ट्रवादी–एसपी)vsअदिती तटकरे (राष्ट्रवादी)
13 जुन्नर- सत्यशील शेरकर (राष्ट्रवादी –एसपी)vsअतुल बेनके (राष्ट्रवादी)
14 आंबेगाव- देवदत्त निकम (राष्ट्रवादी –एसपी)vs दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)
15 शिरूर- अशोक पवार- (राष्ट्रवादी –एसपी)vsज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी)
16 इंदापूर- हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी –एसपी)vsदत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी)
17 पिंपरी- सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी –एसपी)vsअण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)
18 वडगाव शेरी- बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी –एसपी)vsसुनील टिंगरे (राष्ट्रवादी)
19 हडपसर- प्रशांत जगताप (राष्ट्रवादी –एसपी)vsचेतन तुपे (राष्ट्रवादी)
20 अकोले-अमित भांगरे (राष्ट्रवादी –एसपी)vsडॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी)
21 कोपरगाव-संदीप वर्पे (राष्ट्रवादी –एसपी)vsआशुतोष काळे (राष्ट्रवादी )
22 पारनेर-राणी लंके (राष्ट्रवादी –एसपी)vsकाशीनाथ दाते (राष्ट्रवादी)
23 अहमदनगर शहर-अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी –एसपी)vsसंग्राम जगताप (राष्ट्रवादी)
24 माजलगाव-मोहन जगताप (राष्ट्रवादी –एसपी)vsप्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)
25 बीड-संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी –एसपी)vsयोगेश क्षीरसागर (राष्ट्रवादी)
26 परळी-राजेसाहेब देशमुख (राष्ट्रवादी –एसपी)vsधनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
27 अहमदपूर-विनायक जाधव (राष्ट्रवादी –एसपी)vsबाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
28 उदगीर-सुधाकर भालेराव (राष्ट्रवादी –एसपी)vsसंजय बनसोडे (राष्ट्रवादी)
29 माढा-अभिजीत- पाटील (राष्ट्रवादी – एसपी)vsमीनल साठे (राष्ट्रवादी)
30 मोहोळ- राजू खरे (राष्ट्रवादी –एसपी)vsयशवंत माने (राष्ट्रवादी)
31 फलटण- दीपक चव्हाण (राष्ट्रवादी –एसपी)vsसचिन पाटील (राष्ट्रवादी )
32 वाई- अरुणा पिसाळ (राष्ट्रवादी –एसपी) vsमकरंद पाटील (राष्ट्रवादी )
33 चिपळूण- प्रशांत यादव (राष्ट्रवादी –एसपी)vsशेखर निकम (राष्ट्रवादी )
34 चंदगड- नंदिता बाभूळकर (राष्ट्रवादी –एसपी)vsराजेश पाटील (राष्ट्रवादी )
35 कागल- समरजित घाटगे (राष्ट्रवादी –एसपी)vsहसन मुश्रीफ (राष्ट्रवादी )
36 इस्लामपूर- जयंत पाटील (राष्ट्रवादी –एसपी)vsनिशिकांत पाटील (राष्ट्रवादी )
37 तासगाव –रोहित पाटील (राष्ट्रवादी –एसपी)vsसंजय पाटील (राष्ट्रवादी)
