यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 4100 च्या आसपास उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी थेट लढत आहे. तर, दुसरीकडे दोन्ही बाजूकडे इच्छुक असलेल्यांनी बंडाचा झेंडा फडकावत उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीत अपक्षांनी देखील जोर लावला आहे. त्यामुळे निवडणूक निकालात काय होईल, याचा अंदाज बांधण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement
आकडेवारीने मविआ-महायुतीला टेन्शन
अपक्ष, बंडखोरांनी राज्याच्या निवडणुकीत सरासरी 9 ते 12 टक्के मते मिळवली आहेत. तर, 30 वर्षांपूर्वी 1995 च्या निवडणुकीत अपक्षांनी जवळपास 24 टक्के मिळवली होती. या निवडणुकीत अपक्षांकडे सत्तेची चावी होती. आता, या निवडणुकीत काय होणार, याकडे लक्ष लागले आहे. यंदादेखील बंडखोर, अपक्षांची काही ठिकाणी सरशी होणार असल्याचा कयास आहे.
1995 मध्ये काय घडलं?
1995 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 32.16 टक्के मते मिळाली. तर, काँग्रेसला 31.23 टक्के मते, शिवसेनेला 27.7 टक्के मिळाली. त्यानंतर अपक्षांना 23.63 टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत अपक्षांनी तब्बल 45 जागा मिळाल्या होत्या. यातील अनेक अपक्ष उमेदवार हे काँग्रेसचे होते.
कोणत्या निवडणुकीत अपक्षांना किती मते?
वर्ष अपक्षांना किती मते टक्के
1995 23.63 टक्के
1999 9.49 टक्के
2004 14.05 टक्के
2009 15.51 टक्के
2014 4.71 टक्के
2019 9.93 टक्के
