TRENDING:

Maharashtra Elections 2024 : अमित ठाकरेंची आदित्यवर बोचरी टीका, 'या' कारणांसाठी मनसेचा वरळीत उमेदवार!

Last Updated:

Maharashtra Assembly Elections Amit Thackeray On Aaditya Thackeray : मनसे नेते आणि उमेदवार अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका करताना वरळीतून मनसेने आपला उमेदवार का दिला याचे कारण सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे देखील पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित ठाकरे यांनी निवडणूक प्रचाराचे काम सुरू केले आहे. वरळीतून चुलत बंधू आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार का दिला, याचे कारणही सांगितले आहे.
वरळीतून आदित्यविरोधात उमेदवार का दिला? अमित ठाकरेंनी बोचरी टीका करत स्पष्टच सांगितलं...
वरळीतून आदित्यविरोधात उमेदवार का दिला? अमित ठाकरेंनी बोचरी टीका करत स्पष्टच सांगितलं...
advertisement

मनसे नेते आणि उमेदवार अमित ठाकरे यांनी न्यूज 18 सोबत बोलताना मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. अमित ठाकरे यांनी उमेदवारीबाबत बोलताना सांगितले की, उमेदवारीबाबत राज ठाकरे आणि माझं कोणतंही बोलणं झालं नाही. मनसे नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी, त्या बैठकीत मी पक्षाला गरज असेल त्या ठिकाणी काम करण्याची, निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर एकदा राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी आहे का, असे विचारले. त्यासाठी काय काय तयारी लागते, कसे काम करावे लागते हे सांगितले. माझा होकार आल्यानंतर उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळण्याआधी राज ठाकरे आणि माझं बोलणं झालं नाही. आमचा मतदारसंघ कोणता असेल याची चर्चा देखील झाली नव्हती, असेही अमित यांनी सांगितले.

advertisement

आदित्यविरोधात उमेदवार का दिला?

या मुलाखतीत अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. आदित्यविरोधात उमेदवार का दिला, याचे कारणही अमित यांनी सांगितले. अमित ठाकरे यांनी सांगितले की, आदित्यची आमदार म्हणून कामगिरी बिलकुल आवडली नाही. वरळीतील, त्या मतदारसंघातील प्रश्न सुटले नाहीत. एक आमदार म्हणून आपण सगळ्यांना उपलब्ध असणे आवश्यक असते. पण, आदित्य हा आमदार म्हणून उपलब्ध नव्हता. लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही माणसं नेमू शकत नाही, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले.

advertisement

वरळीत अनेक प्रश्न तसेच आहेत. बीडीडी चाळीतील रहिवासी असतील, कोळी बांधवांचे प्रश्न असतील हे सगळे तसेच आहेत. त्यामुळेच मनसेने तिथे उमेदवार दिला असल्याचे अमित ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले. आम्ही वरळीतील लोकांना गृहित धरू शकत नाही. कोविडच्या काळात वरळीतील अनेक लोक राजगडला येऊन भेटायची. त्यावेळी त्यांना अनेक त्रास होत होता. पण, त्यांच्या प्रश्नावर काम झाले नाही. पण, कोविडमध्ये तुम्ही घोटाळे करत बसले होते असे टीकास्त्र अमित ठाकरे यांनी सोडले.

advertisement

उद्धव यांच्यावरही टीका...

अमित ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत पुढे म्हटले की, उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून मला त्यांची कामगिरी आवडली नाही. कोविड काळात मुख्यमंत्र्यांची दारे बंद होती . मुख्यमंत्री म्हणून 100 टक्के नाही तर 200 टक्के काम करायला हवे होते ते झाले नाही. मुख्यमंत्री असाताना उद्धव ठाकरेंनी एका शेतकरीला प्रश्न विचारला की पैसे मिळाले का तर त्याने तोंडावर सांगितले नाही मिळाले. मग मुख्यमंत्री म्हणून तुन्ही काय केले. तुमचे काम आहे की पैसे शेवटच्या घटकापर्यंत पोहचत आहेत की नाही हे पाहणे, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले.

advertisement

इतर महत्त्वाची बातमी :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

Maharashtra Elections 2024 : मागासवर्गीयांच्या मतांसाठी महायुतीचा गेमप्लान! मविआची मते खेचण्यासाठी नव्या डावाची मांडणी

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 : अमित ठाकरेंची आदित्यवर बोचरी टीका, 'या' कारणांसाठी मनसेचा वरळीत उमेदवार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल