हिना गावित या नंदुरबारच्या माजी खासदार आहेत. हिना गावित यांनी म्हटले की, शिवसेनेने भाजपचा फायदा घेतला आहे. नंदुरबारमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ गावित आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात शिवसेनेचे नंदुरबारमधील लोक काम करत आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे. वरिष्ठांच्या कानावर हा सगळा प्रकार घातला होता. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. वरिष्ठ पातळीवरून कोणतीही कारवाई न झाल्याने आपण अक्कलकुआमधून माघार घेत असल्याचे सांगितले.
advertisement
गावित यांनी म्हटले की, शिवसेना शिंदे गटाने भाजपचा फायदा घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत शिेंदे गटाने महायुतीचा धर्म पाळला नाही. आताही युतीचा धर्म पाळला जात नाही. त्यामुळे आता मी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे हिना गावित यांनी सांगितले.
हिना गावित यांचा राजीनामा हा शिवसेना शिंदे गट आणि भाजपा मधील वादाची परिणीती असल्याचे म्हटले जाते. पक्षाच्या वरिष्ठांकडून होत असलेल्या सोईस्कर दुर्लक्षाचा महायुतीला मोठा फटक पडण्याची शक्यता आहे.
