Maharashtra Elections Mahayuti : 'या' दोन शिलेदारांमुळे भाई-दादांमध्ये वादाचा भडका? महायुतीचे टेन्शन वाढलं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections 2024 : या दोन मतदारसंघात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे शिलेदार आमने-सामने आल्याने महायुतीचे टेन्शन वाढले आहे.
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची काल (4 नोव्हेंबर) शेवटची मुदत होती. यात बऱ्याच बंडखोरांना थांबवण्यात नेत्यांना यश आलं आहे. मात्र जिल्ह्यातील भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघातील गणितांमुळे महायुतीत खटके उडायला सुरुवात झाली आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विजय शिवतारे रिंगणात आहेत. तर भोरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर हे निवडणूक लढवत आहेत. मात्र या दोन मतदारसंघात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे शिलेदार आमने-सामने आल्याने महायुतीचे टेन्शन वाढले आहे.
काय झालं नेमकं?
पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने विजय बापू शिवतारे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर अजित पवार यांनी पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून संभाजी झेंडे यांना मैदानात उतरवल आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पुरंदर विधानसभा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होत आहे. तर दुसरीकडे भोर विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे दोन शिलेदार आमने-सामने उभे राहिले आहेत. अजित पवार यांनी शंकर मांडेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप कोंडे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र ही बंडखोरी थांबवण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं नाही त्यामुळे अजित पवार यांच्या उमेदवाराच्या विरोधात एकनाथ शिंदेंचे कुलदीप कोंडे हे रिंगणात आहेत.
advertisement
या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे आणि पवार यांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात आल्याने पवार आणि शिंदे यांच्यामध्ये खटका उडल्याची चर्चा आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघातून संभाजी झेंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना केली होती तर त्या बदल्यात भोर मधील बंडखोरी एकनाथ शिंदे यांनी थोपवावी असं पवार हे शिंदे यांना म्हंटल्याची माहिती आहे. मात्र दोन्ही ठिकाणी उमेदवार कायम असल्याने भोर आणि पुरंदर मुळे पवार-शिंदे यांच्यात खटका उडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
advertisement
तोडगा कसा काढणार?
आता संभाजी झेंडे हे पुरंदर मधून आणि कुलदीप कोंडे हे भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने महायुतीतील नेते नक्की काय भूमिका घेणार यावर फक्त हे दोन विधानसभा मतदारसंघचं नाही तर जिल्ह्याच्या इतर विधानसभा मतदारसंघांवर देखील याचा परिणाम होणार आहे. मात्र ऐनवेळेस हे दोन्ही नेते महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंब्याचं पत्र देण्याची देखील शक्यता असल्याने पुरंदर आणि भोर मधला पेच सोडवण्याच मोठ आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर असणार आहे.
advertisement
इतर महत्त्वाची बातमी :
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 05, 2024 11:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Mahayuti : 'या' दोन शिलेदारांमुळे भाई-दादांमध्ये वादाचा भडका? महायुतीचे टेन्शन वाढलं











