Maharashtra Elections Mahim : माझ्या उमेदवारी माघारीने अमितला फायदा कसा? सरवणकर असे का बोलले? जाणून घ्या माहीममधील समीकरण....

Last Updated:

Maharashtra Assembly Elections Amit Thackeray Sada Sarvankar : आपण उमेदवारी माघार घेतल्याने अमित ठाकरेंना फायदा होईल का, असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. आता, त्याच वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.

सदा सरवणकर-अमित ठाकरे
सदा सरवणकर-अमित ठाकरे
मुंबई : विधानसभा निवडणुकीतून उमेदवारी मागे घेण्यासाठी सोमवारी, 4 नोव्हेंबर रोजी शेवटचा दिवस होता. राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरांची समजूत काढण्यास महायुती आणि महाविकास आघाडी यांना यश आले. तर, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. या सगळ्यात माहिममधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सदा सरवणकर हे अमित ठाकरे यांच्यासाठी माघार घेणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, सरवणकरांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. आपण उमेदवारी माघार घेतल्याने अमित ठाकरेंना फायदा होईल का, असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. आता, त्याच वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. सदा सरवणकरांच्या उमेदवारीने आता माहीम मतदारसंघात तीन प्रमुख उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे देखील पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचे आव्हान आहे. अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे दुसरे ठाकरे आहेत. राज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभा निवडणुकीत केलेले सहकार्य पाहता, मनसेसाठी हा मतदारसंघ सोडला जावा अशी भूमिका भाजपने घेतली होती. तर, सदा सरवणकर यांनी त्याला विरोध केला होता. भाजपने आपल्या जागेवर मनसेला पाठिंबा द्यावा असे सरवणकरांनी सुनावले होते.
advertisement

सदा सरवणकरांच्या त्या वक्तव्याची चर्चा...

शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी माझ्या उमेदवारी माघारीने अमितला कसा फायदा होईल असे विचारले होते. याचा दुसरा अर्थ, दुहेरी लढतीत अमित ठाकरे यांचा पराभव झाला असता का, अशी चर्चा सुरू झाली आहे. माहीम मध्ये आता तीन उमेदवार असल्याने आता या तिहेरी लढतीत अमित ठाकरे यांना विजयाची संधी आहे का, अशी चर्चा आहे.
advertisement

लोकसभा निवडणुकीत आघाडी...

माहीम मतदारसंघाचा समावेश हा दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात होतो. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या माहीम विधानसभेतून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांना जवळपास 16 हजार मतांची आघाडी होती. तर, अनिल देसाई हे पिछाडीवर होते. राहुल शेवाळे यांना माहीम आणि वडाळा या दोनच मतदारसंघातून देसाईंविरोधात आघाडी मिळाली होती. त्यामुळे शिंदे गटाला विधानसभेत विजयाची आशा आहे. पण, महायुतीला मनसेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे मनसेशिवाय किती मते मिळाली असतील हा प्रश्न अनुत्तरीत आहेत.
advertisement

माहीममधील समीकरण काय?

माहीम मतदारसंघात 45 हजारांच्या आसपास मराठी, 33 हजारांच्या जवळपास मुस्लिम आणि 9 हजारांच्या आसपास ख्रिश्चन मतं आहेत, त्यामुळे मराठी मतांचं विभाजन तीन पक्षांमध्ये होण्याची शक्यता आहे. अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय घटकांची मते विभागली जाण्याचा अंदाज आहे.
दादर-माहीम या विधानसभा क्षेत्रात मनसेचा मतदार आहे. अमित ठाकरे यांच्यामुळे हा मतदार मनसेकडे कायम राहील आणि इतर मते मिळतील असा अंदाज आहे. 2019 च्या निवडणुकीत मनसेच्या संदीप देशपांडेंना 42 हजार मते होती. तर, दुसरीकडे सदा सरवणकर यांनी शिवसैनिक, नगरसेवक ते आमदार असा प्रवास केल्याने त्यांना या मतदारसंघाची व्यवस्थित माहिती आहे. त्यांच्या परिचयातील हा मतदारसंघ असल्याने त्यांना यातील सकारात्मक गोष्टी आपल्याकडे वळवता येणे शक्य आहे. 2009 मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमधून उभे राहिल्यानंतरही सदा सरवणकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. शिवसेनेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. मनसेचे नितीन सरदेसाई यांनी बाजी मारली होती.
advertisement
शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत हे उमेदवार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात असलेल्या सदा सरवणकर यांच्याकडून मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी महेश सावंत प्रयत्नशील असणार आहेत. प्रभादेवी-दादर-माहीम हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या विभागातील संघटना ठाकरेंसोबत राहिली. तर, सदा सरवणकर यांचे सुपुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे वडिलांसोबत गेले आहेत. तर, इतर नगरसेवक ठाकरेंसोबत कायम आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेला मिळालेली मते कायम ठेवण्यासाठी प्रयत्न असणार आहेत.
advertisement

अमित ठाकरेंना फायदा होणार?

सध्याची राजकीय परिस्थिती आणि समीकरणे पाहता माहीम मधील निवडणूक चुरशीची होणार आहे. सदा सरवणकर यांनी माघार घेतली असती तर शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये थेट लढत झाली असती. यामुळे सदा सरवणकर यांच्याकडे असलेला बहुतांशी मतदार हा ठाकरेंकडे वळला असता. सरवणकर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनीदेखील पडद्याआडून अमित ठाकरेंविरोधात काम करण्याची शक्यता होती. तर, सरवणकर नसल्याने प्रभादेवीमधील मते ही महेश सावंत यांच्याकडे पूर्णपणे वळली असती. आता सरवणकरांमुळे या मतांमध्ये विभागणी होणार आहे. या तिरंगी लढतीमुळे अमित ठाकरे यांचादेखील विजय होऊ शकतो. त्याचमुळे सरवणकरांची उमेदवारी ही अमित ठाकरेंच्या पथ्यावर पडू शकते. प्रचाराचा वाढत जाणारा रंग, वेगवेगळे मुद्दे, आश्वसने यावर मतदार काय कौल देणार, हे निकालाच्या दिनी स्पष्ट होणार आहे.
advertisement
>> माहीम मतदारसंघाचे 2019 चे निकाल
सदा सरवणकर- शिवसेना- 61,337 मतं
संदीप देशपांडे- मनसे- 42,690 मतं
प्रविण नाईक- काँग्रेस- 15,246 मतं
>> माहीमचा 2014 चा निकाल
सदा सरवणकर- शिवसेना- 46,291 मतं
नितीन सरदेसाई- मनसे- 40,350 मतं
रमेश आंबेकर- भाजप- 33,446 मतं
>> माहीमचा 2009 चा निकाल
नितीन सरदेसाई- मनसे- 48,734 मतं
सदा सरवणकर- काँग्रेस- 39,808 मतं
आदेश बांदेकर- शिवसेना- 36,364 मतं

इतर महत्त्वाची बातमी :

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Mahim : माझ्या उमेदवारी माघारीने अमितला फायदा कसा? सरवणकर असे का बोलले? जाणून घ्या माहीममधील समीकरण....
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement