'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यातील विधानसभा निवडणुकीत 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी फक्त 420 उमेदवार हे मुस्लिम आहेत. बहुसंख्य मु्स्लिम उमेदवार हे मुस्लिमबहुल भागातील आहेत. मालेगावमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेले सर्व 13 उमेदवार मुस्लिम आहेत. औरंगाबाद पूर्वमधून एकूण 29 उमेदवारांपैकी 17 उमेदवार मुस्लिम आहेत. भिवंडी पश्चिममध्ये 11, मानखुर्द शिवाजीनगरमध्ये 13, नांदेड उत्तर, मुंबादेवी, मालाड पश्चिम या मतदारसंघात 9 मुस्लिम उमेदवार आहेत.
advertisement
राजकीय पक्षांमध्येही अनास्था?
राज्यात मुस्लिम उमेदवारांबाबत प्रमुख राजकीय पक्षांमध्ये अनास्था असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात ओवैसी यांच्या एमआयएमने सर्वाधिक 16 उमेदवार मुस्लिम दिले आहेत. त्यानंतर काँग्रेसने 9 मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. तर भाजपाने एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 5 मुस्लिम उमेदवारांना संधी दिली. सर्वाधिक मुस्लिम उमेदवार हे अपक्ष असून 218 जण निवडणुकीच्या मैदानात आपलं नशीब आजमावत आहेत.
