मागील काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराच्या तोफा धडधडत होत्या. तर, काँग्रेसकडू नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि इतर नेत्यांच्या प्रचारसभा सुरू होत्या. आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उतरणार आहेत.
राहुल गांधी यांचा नवा डाव...
राहुल गांधी यांची काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात सभा होणार होती. पण, विमानात बिघाड झाल्याने पुन्हा माघारी जावे लागले होते. त्यानंतर आज नंदुरबार आणि नांदेडमधील जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. त्यापूर्वीच राहुल गांधी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधी हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.
advertisement
या व्हिडीओत शेतकरी सोयाबीनचे दर आणि इतर मुद्यांबाबतच्या समस्या राहुल गांधींसमोर मांडत असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी हमीभावानुसार सोयाबीनची खरेदी होत नसल्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. राहुल गांधी यांनी आमचं सरकारच आल्यास 3 लाख रुपयांपर्यंतचे शेतकरी कर्ज माफ करणार असल्याचे आश्वासन राहुल यांनी दिले. सोयाबीन योग्य दर कसा मिळेल यासाठी प्रयत्न होणार असल्याचे राहुल यांनी सांगितले.
मिशन विदर्भ यशस्वी होणार?
विदर्भात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. राज्यातील सत्ता समीकरणे विदर्भावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. त्यामुळे आता राहुल यांचा नवा डाव हा राज्यात मविआला बुस्टर डोस ठरेल का, हे निवडणूक निकालात समजेल.
