भाजपला सर्वाधिक मते...
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत भाजप हा मोठा पक्ष ठरला. भाजपला 26.77 टक्के मते मिळाली आणि 132 जागांवर विजय मिळाला. तर, दुसऱ्याकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला 12.38 टक्के मिळाली. एकनाथ शिंदेंच्या पारड्यात 57 जागा आल्या. तर, दुसरीकडे काँग्रेसला देखील 12.42 टक्के मते मिळाली. पण, त्यांना 16 जागांवर विजय मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला शिंदे गटापेक्षा 2.42 टक्के मते मिळाली. उद्धव ठाकरे यांचे 20 उमेदवार विजयी झाले.
advertisement
मनसेचं काय?
राज्यात 125 जागांवर आपले उमेदवार देणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळाली नाही. मात्र, त्यांना 1.55 टक्के मिळाली. राज्यातील निवडणुकीत 0.72 टक्के अर्थात 4 लाख 61 हजार 886 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. ही मतांची संख्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या मतदानापेक्षा अधिक आहे. प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने 200 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. समाजवादी पक्षाने दोन जागा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एका जागेवर विजय मिळाला. समाजवादीने राज्यात 5 आणि माकपने 3 जागांवर उमेदवार उभे केले.
