माहिम विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होईल असा अंदाज आहे. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी जाहीर झाली. तर, शिवसेना ठाकरे गटाने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. तर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अमित पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाकडून आपल्या बालेकिल्ल्यावर पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तर, दुसरीकडे पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी अमित ठाकरे यांनीदेखील कंबर कसली आहे.
advertisement
व्हॉट्सअॅप स्टेट्सने चर्चांना उधाण
सरवणकर उमेदवारी मागे घेणार का, याची चर्चा सुरू असताना त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सने चर्चांना उधाण आले आहे. सदा सरवणकर हे मंगळवारी आपला निवडणूक अर्ज भरणार असल्याचे समाधान सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदा सरवणकर हे तूर्तास तरी निवडणुकीच्या रिंगणात असल्याची चर्चा आहे. मंगळवार 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, तर 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेता येणार आहेत, त्यामुळे 4 नोव्हेंबरनंतरच माहिममधील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
माहिममधून सदा सरवणकर उमेदवारी मागे घेणार की...? लेकाच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सने चर्चांना उधाण
दरम्यान शनिवारी, आपल्या समर्थकांसोबत बोलताना सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयी होण्याचा आशिर्वाद दिला असल्याचे सांगितले होते.
