TRENDING:

NCP Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजितदादांचा वस्तादाला धोबीपछाड! शरद पवारांच्या किती उमेदवारांचा केला पराभव? पाहा यादी

Last Updated:

Sharad Pawar Vs Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागलेल्या अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांना विधानसभा निवडणुकीत धोबीपछाड दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :  शरद पवार यांच्याशी फारकत घेत 40 आमदारांसह अजित पवार यांनी शड्डू ठोकला आणि पक्षाचे चिन्ह आपल्या बाजूने खेचले. तर, दुसरीकडे शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करत अजित पवारांना आव्हान दिले. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागलेल्या अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांना विधानसभा निवडणुकीत धोबीपछाड दिला.
अजितदादांचा वस्तादाला धोबीपछाड! शरद पवारांच्या किती उमेदवारांचा केला पराभव? पाहा यादी
अजितदादांचा वस्तादाला धोबीपछाड! शरद पवारांच्या किती उमेदवारांचा केला पराभव? पाहा यादी
advertisement

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार हे 37 जागांवर आमनेसामने आले. लोकसभेत अजित पवार आणि शरद पवार आमनेसामने आले होते. त्यात शरद पवार सरस ठरले. आता मात्र, अजित पवारांनी त्या पराभवाची सव्याज परतफेड केली. अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली. अजित पवारांनी 37 पैकी 27 जागांवर विजय मिळवला. तर शरद पवार गटाची 8 जागांवर सरशी झाली. उर्वरित 2 जागांवर इतर उमेदवार विजयी झाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) राष्ट्रवादी (अजित पवार) विजयी उमेदवार
बारामती युगेंद्र पवार अजित पवार अजित पवार
तुमसर चरण वाघमारे राजू कारेमोरे राजू कारमोरे
अहेरी भाग्यश्री आत्राम धर्मरावबाबा आत्राम धर्मरावबाबा आत्राम
पुसद शरद मैंद इंद्रनील नाईक इंद्रनील नाईक
वसमत जयप्रकाश दांडेगावकर चंद्रकांत नवघरे चंद्रकांत नवघरे
 येवला माणिकराव शिंदे छगन भुजबळ छगन भुजबळ
 सिन्नर उदय सांगळे माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे
दिंडोरी सुनीता चारोसकर नरहरी झिरवळ नरहरी झिरवळ
शहापूर पांडुरंग बरोरा दौलत दरोडा दौलत दरोडा
मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड नजीब मुल्ला जितेंद्र आव्हाड
अणुशक्ती नगर फहाद अहमद सना मलिक सना मलिक
श्रीवर्धन  अनिल नवगणे अदिती तटकरे अदिती तटकरे
जुन्नर सत्यशील शेरकर अतुल बेनके शरद सोनावणे (अपक्ष)
आंबेगाव देवदत्त निकम दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील
शिरूर अशोक पवार ज्ञानेश्वर कटके ज्ञानेश्वर कटके
इंदापूर हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे दत्तात्रय भरणे
पिंपरी सुलक्षणा शिलवंत अण्णा बनसोडे अण्णा बनसोडे
वडगाव शेरी बापूसाहेब पठारे सुनील टिंगरे बापूसाहेब पठारे
हडपसर प्रशांत जगताप चेतन तुपे चेतन तुपे
अकोले अमित भांगरे डॉ. किरण लहामटे डॉ. किरण लहामटे
कोपरगाव संदीप वर्पे आशुतोष काळे आशुतोष काळे
पारनेर राणी लंके काशीनाथ दाते काशीनाथ दाते
अहमदनगर शहर अभिषेक कळमकर संग्राम जगताप संग्राम जगताप
माजलगाव मोहन जगताप प्रकाश सोळंके प्रकाश सोळंके
बीड संदीप क्षीरसागर योगेश क्षीरसागर संदीप क्षीरसागर
 परळी राजेसाहेब देशमुख धनंजय मुंडे धनंजय मुंडे
अहमदपूर विनायक जाधव बाबासाहेब पाटील बाबासाहेब पाटील
माढा अभिजीत पाटील मीनल साठे मीनल साठे
मोहोळ राजू खरे यशवंत माने राजू खरे
फलटण दीपक चव्हाण सचिन पाटील सचिन पाटील
वाई अरुणा पिसाळ मकरंद पाटील मकरंद पाटील
चिपळूण प्रशांत यादव शेखर निकम प्रशांत यादव
चंदगड नंदिता बाभूळकर राजेश पाटील राजेश बाभूळकर
कागल समरजित घाटगे हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ
इस्लामपूर जयंत पाटील निशिकांत पाटील जयंत पाटील
तासगाव रोहित पाटील संजय पाटील रोहित पाटील

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजितदादांचा वस्तादाला धोबीपछाड! शरद पवारांच्या किती उमेदवारांचा केला पराभव? पाहा यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल