आज शिवसेना ठाकरे गटाचा निवडणूक वचननामाचे 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना उद्धव यांनी विविध मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
माहीममध्ये प्रचारसभा नाही?
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मुंबईत मविआची सभा झाल्यानंतर आता, 17 नोव्हेंबर रोजी सभा पार पडणार आहे. माहीम मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे. माझा मुंबईकरांवर विश्वास आहे. सध्याची स्थिती पाहता दिवसाला 4 सभा घेतल्या तरी सगळ्या मतदारसंघात प्रचार करू शकत नाही.
advertisement
निवडणूक आयोग, पोलिसांना आवाहन...
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, 17 नोव्हेंबरच्या सभेसाठी आम्ही परवानगी मागितली आहे. हा शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन आहे. याही वर्षी लाखो शिवसैनिक येणार आहेत. तिथं केवळ तुमच्या आडमुठेपणामुळे संघर्ष होऊ देऊ नका. त्याला आचारसंहिता लावू शकत नाहीत. संघर्ष टाळायचा असेल तर 17 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क शिवसैनिकांना द्यावे, असेही ठाकरे यांनी म्हटले.
>> शिवसेना ठाकरे गटाच्या वचननाम्यात मोठ्या घोषणा...
> प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार
> जात-पात-धर्म-पंथ न पाहता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार
> राज्यासाठी नवं गृहनिर्माण धोरण जाहीर करणार
> कोळी बांधवांना मान्य असेल असा कोळीवाड्यांचा विकास करणार
> पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर पुढच्या पाच वर्षांसाठी स्थिर ठेवणार
