खरं तर काही दिवसापूर्वी पुणे या ठिकाणी महाराष्ट्र एटीएसने धाड टाकून काही लोकांना अटक केली होती. यावेळी आरोपींची चौकशी दरम्यान मुंब्रा मध्ये राहणारा एका शिक्षकाचा संबंध असल्याचा माहिती समोर आली होती.
त्यानंतर आज महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा येथील कौसा विभागामध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाच्या घरी धाड टाकली होती. या धाडी दरम्यान घरातले मोबाईल कम्प्युटर आणि इतर सामग्री हस्तगत करण्यात आले होते. यासोबत मुंबईतील कुर्ल्यामधील त्याच्या दुसरा घरी महाराष्ट्र एटीएसने छापा टाकून पुढील तपास सूरू केला आहे.
advertisement
सदरचा शिक्षक हा जमात ये इस्लाम या संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे. शिक्षकाचे नाव समजू शकलेले नाही. पण या कारवाईत आतापर्यंत तरी घरातले मोबाईल कम्प्युटर आणि इतर सामग्री हस्तगत करण्यात आले होते.आता एटीएसच्या हाती काय काय माहिती लागते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अल-कायदा या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला पुण्यातून अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा भागात छापेमारी केली आहे.
'अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट' या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर याला अटक करण्यात आली होती.
