लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला विधानसभेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. विदर्भात काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत मुसंडी मारली होती. त्यामुळे विदर्भातील 62 जागांपैकी महाविकास आघाडी आणि काँग्रेसला यश मिळेल अशी आशा होती. मात्र, महायुतीने काँग्रेस, महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला असून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे.
नागपूर मध्यचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी नाना पटोलेंवर खळबळजनक आरोप केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आरएसएसचे एजंट असल्याचा आरोप बंटी शेळके यांनी केला. आरएसएस मुख्यालय परिसरात प्रियांका गांधींचा रोड शो असताना सुद्धा नाना पटोले यांच्या इशाऱ्यावर संघटनेने मदत केली नसल्याचा आरोपही बंटी शेळके यांनी केला. मला राहुल गांधींनी थेट उमेदवारी जाहीर केली असताना. मात्र, तरी सुद्धा नाना पटोले यांनी संघटनेला माझ्या प्रचारापासून दूर राहण्याचा सूचना केली होती, असा गंभीर आरोप बंटी शेळके यांनी केली.
advertisement
विधानसभेतील निराशाजनक कामगिरीमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पक्षातंर्गत मोठी टीका होत आहे. काँग्रेसला विदर्भात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. नाना पटोले हे स्वत: जवळपास 212 मतांनी विजयी झाले.
