शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आलीय. यामुळे संजय राऊतांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. ते आता थेट नवीन वर्षात सार्वजनिक जीवनात पुनरागमन करणार आहे. खासदार संजय राऊत सध्या आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याविषयी संजय राऊत यांनी माहिती दिल्यानंतर राजकीय मित्र, राजकीय विरोधक यांनी त्यांना फोन, मेसेज करत लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
advertisement
राऊत आणि शिंदे कट्टर विरोध
संजय राऊत आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकरणातील कट्टर विरोधक आहे. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा आहे की, कट्टर शत्रू किंवा विरोधक जरी असला तरी संकटाच्या वेळी सगळे धावून जातात. त्याचीच प्रचिती देणार एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ समोर आला आहे. एकनाथ शिंदेवर संजय राऊतांवर टीका करायचे परंतु आज एकनाथ शिंदेंनी राऊत यांच्या भावाला फोन करत काळजीने फोन करत विचारपूरस केली आहे.
नेमंक काय म्हणाले एकनाथ शिंदे?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन केला. फोनवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना लवकर बरे व्हावे अशी शुभेच्छा दिल्या. तसेच हॉस्पिटलमधून घरी कधी आणले याची चौकशी आणि लवकर बरे व्हा असा निरोप देखील दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून राऊतांची प्रकृती लवकर ठीक व्हावी अशी प्रार्थना केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याशी फोनवरून बोलून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील गेल्या काही वर्षातील हे सुखवणारे चित्र असल्याची चर्चा रंगली आहे.
