राज्यात विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 200 जागा लढवल्या आहेत. राज्यातील 194 मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांची अमानत रक्कम जप्त झाली. काही ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली होती.
वंचितने कोणाच्या जागा पाडल्या?
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसला. दोन्ही आघाडींचा मतांचा आधार हा मागासवर्गीय, अल्पसंख्याक, ओबीसी घटक आहे. या मतांमध्ये विभागणी झाली. वंचितच्या उमेदवारांमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 8, काँग्रेस 6, शिवसेना ठाकरे 6 आणि एमआयएमच्या 2 उमेदवारांचा समावेश आहे.
advertisement
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप नाईक, सतीश चव्हाण, राजेश टोपे, राहुल मोटे, राजेंद्र शिंगणे, फहाद अहमद यांचा अगदी थोड्यात पराभव झाला. तर, काँग्रेसचे वसंत पुरके, दिलीप सानंद, धीरज देशमुख यांना नेत्यांनादेखील कमी मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
वंचितचे उमेदवार महायुतीच्या पथ्यावर
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड आणि तानाजी सावंत यांचा थोडक्यात मतांनी पराभव झाला. तर, दुसरीकडे अतुल सावे, मंदा म्हात्रे, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर, रमेश कराड या उमेदवारांचा कमी मतांनी विजय झाला. या मतदारसंघात वंचितने घेतलेली मते महायुतीच्या पथ्यावर पडली.
वंचितची दखलपात्र कामगिरी
'वंचित'ला या विधानसभा निवडणुकीत एकूण 14 लाख 22 हजार मते मिळाली. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'वंचित'ला 15 लाख 82 हजार (3.6 टक्के) मते मिळाली होती. अल्पसंख्याकबहुल मतदारसंघात ‘वंचित’ने या वेळी मुस्लीम उमेदवार दिले. त्यामुळे इम्तियाज जलील आणि सिद्दीकी नसुरीद्दीन तकुद्दीन हे छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार पडले. वंचितने मायवती यांच्या बहुजन समाज पक्षापेक्षा अधिक मते घेतली. मायावती यांच्या बसपाने 237 उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र, बसपाला फक्त 0.48 टक्के इतकी अत्यल्प मते मिळाली.
