क्षितीज ठाकूरांसह बविआ कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घूसून विनोद तावडे यांनी घेरलं आहे.तसेच यावेळी एका कार्यकर्त्यांने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली त्यामध्ये पैसै भरलेले लिफाफे सापडले. यानंतर एकच गोंधळ उडाला. विनोद तावडे हे कशासाठी आले होते, याची माहिती उमेदवार राजन नाईक यांनी दिली.
राजन नाईक यांनी काय म्हटले?
राजन यांनी सांगितले की, विनोद तावडे हे आज प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू होती. मतदानासाठी मतदारांना कसे उतरावे, मतदानाच्या दिवशी कशी खबरदारी घ्यावी, कार्यकर्त्यांना मतदानाच्या दिवशी कोणती काळजी घ्यावी या संबंधी मार्गदर्शन विनोद तावडे करत होते. मात्र, त्याच वेळी अचानक बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे पैसे कोणी आणले, कोणाचे आहेत याची चौकशी करा. मात्र, आमचा आणि पैशांचा संबंध नसल्याचेही राजन नाईक यांनी सांगितले.
advertisement
नेमकं काय झालं?
विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे आले होते. याबातची माहिती नालासोपारा विधानसभेचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह हॉटेल गाठले. यावेळी एका कार्यकर्त्यांने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली त्यामध्ये पैसै भरलेले लिफाफे सापडले होते. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी हे लिफाफे उघडून पैसे दाखवले.
