पुण्यातील आंबेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचार सभेत हजेरी लावली. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले की, अजितदादा आपल्या विरुद्ध बरेच बोलले आहेत. आज दुपारी बारामतीला सभा आहे. माझ्या मतदारसंघात मी त्यांना उत्तर देणार नाही तर तुमच्या मतदार संघात येऊन उत्तर देणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. 'इलाका तुम्हारा धमाका हमारा है असेही कोल्हे यांनी म्हटले.
advertisement
अजितदादांवर निशाणा....
मी जर तोंड उघडलं तर अनेकांची अडचण होईल असा इशाराही त्यांनी दिला. कोल्हे यांनी म्हटले की, खासदारांना कळत नाही असं म्हणाऱ्यांना सांगतो की पवार साहेबांनी मला मांडीवर घेऊन अनेक मंत्री पदे दिली नाहीत. शरद पवारांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र पिंजून काढले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे त्यांनी म्हटले. शरद पवारांचा काही नेम नसून महाराष्ट्र सरकार तो झाँकी है, केंद्र सरकार बाकी है असं म्हणत आगामी राजकीय घडामोडींबाबत भाष्य केले.
शेतकऱ्यांच्या हमीभावाचं काय झालं?
शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव का नाही, असा थेट सवाल डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारला. राज्यातील उद्योग बाहेर गेले, रोजगार बुडाला असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. विकास विकास म्हणता मग दिवसाला आठ महिन्याला 200 शेतकरी का आत्महत्या करतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची मग या विकासाचा फायदा असा सवालही त्यांनी केला.
आता शरद पवारांची सुनामी...
खासदार कोल्हे यांनी सांगितले की, शरद पवारांना ज्यांनी सोडलं त्यांना सोडण्याचा निर्णय जनतेने घेतला असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांची लाट होती, आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुनामी येणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले की, मतदान वीस, निकाल तेवीस आणि घरी पाठवायचे शिंदे फडणवीस असे आवाहनही त्यांनी केले.