TRENDING:

Maharashtra Elections : गडकरीचं फडणवीसांसोबत मेनलँड चायनात डिनर अन् भाजपाचा वाचला चार्टर्ड विमानाचा खर्च

Last Updated:

Nitin Gadkari Devendra Fadnavis : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रित डिनरमुळे भाजपचा चार्टर्ड विमानाचा खर्च वाचला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे : देशाचे परिवहन मंत्री नितीन गडकरी पुण्यात शनिवारी विधानसभेच्या प्रचार दौऱ्यात होते. पुण्यात आज संध्याकाळी त्यांनी कोथरूड विधानसभेचे भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. नियोजनानुसार गडकरी हे आज पुणे मुक्कामी राहणार होते. गडकरी हे भाजपचे स्टार प्रचारक असल्याने त्यांच्या प्रवासासाठी विशेष चार्टर्ड विमानाची सोय करण्यात आलेली होती. कमी वेळेत जास्त ठिकाणी प्रवास करता यावा म्हणून विमानाच नियोजन केलं जातं. निवडणूक आचारसंहितेनुसार विमान खर्च हा पक्षाच्या निवडणूक खर्चात नोंदवण्यात येतो. त्यामुळे या विमानांच्या खर्चाच नियोजन ही काटेकोर करण्यात येते.
Nitin Gadkari Devendra fadnavis
Nitin Gadkari Devendra fadnavis
advertisement

गडकरी पुण्यात मुक्कामी राहणार असल्याचं नियोजन असल्याने ते पुण्यात पोहोचल्यावर गडकरींच चार्टर्ड विमान हे कंगना रनौत यांना प्रचारसभांना पोहोचण्यासाठी पाठवण्यात आलं. दरम्यान पुण्यात सभांना संबोधित करून गडकरी रविवारी नाशिकला प्रचारसभांना जाणार होते. त्यानुसार त्यांच्या प्रवासाचं नियोजन ही करण्यात आलं होतं. मात्र गडकरींनी पुण्यातली सभा झाल्यावर मुक्काम करण्याऐवजी नागपूरला पुन्हा परत जाऊन सकाळी नाशिकला सभांना जाणार असल्याचं पक्षांच्या नियोजन करणाऱ्या यंत्रणेला कळवलं. मात्र, ऐनवेळी प्रवासाला गडकरींचं विमान कंगना रनौतला पाठवल्याने काय करायचं असा यक्ष प्रश्न भाजपच्या राज्य प्रचार नियोजन करणाऱ्या यंत्रणेसमोर उभा राहिला होता.

advertisement

दरम्यान गडकरींच लज्जतदार चवीच्या जेवणाच प्रेम सर्वश्रुत आहेच. गडकरींनी अस्सल चवीच्या चायनीज सॅासेज मध्ये बनवलेलं चायनीज प्रचंड आवडतं. तसं चायनीज दिल जातं ते सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या जेडब्ल्यू मेरिएटच्या अगदी समोर असलेल्या मेनलँड चायना या रेस्टॅारंटमध्ये. त्यामुळेच हे रेस्टॅारंट हे गडकरींच अगदी आवडतं. अनेकदा पुण्यात आल्यावर या रेस्टॅारंटमध्ये जेवण्यासाठी ते मेरिएट हॅाटेलला मुक्कामी थांबतात. तसं त्यांनीच अनेक मुलाखतींमधे जाहीर सांगितलेल ही आहे. आजही गडकरींच या रेस्टॅारंटमध्ये जेवायला जाणं आणि मेरिएटमधे मुक्काम नियोजित होता. मात्र ऐनवेळी त्यांनी मुक्काम रद्द करून नागपूरला जायचा निर्णय घेतल्याने पक्षाच्या यंत्रणेसमोर पुन्हा विमान बोलवण्याचा निर्णय घेणं अपरिहार्य झालं होतं. पण त्याने पक्षाच्या निवडणूक खर्चात वाढ होणार होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतीला पूरक निवडला व्यवसाय, 2 गायींपासून केली सुरूवात, महिन्याला दीड लाख उलाढाल
सर्व पहा

याच दरम्यान उपमुख्यमंत्री हे भोसरी विधानसभेत प्रचार सभेसाठी आलेले होते. प्रचारसभा आटोपून ते थेट विमानाने नागपूरला जाणार होते. त्यामुळे पक्षाच्या यंत्रणेने फडणवीस आणि गडकरी एकत्र एकाच विमानाने नागपूर जातील असं नियोजन करता येतं का याची चाचपणी सुरू केली. मात्र फडणवीसांची सभा संपणार होती साडेनऊ वाजता आणि गडकरी प्रचारसभा माध्यमांची मुलाखत आणि मेनलँड चायनाच जेवण संपवून नागपूरला निघायला अकरा वाजून जाणार होते. फडणवीसांना याची कल्पना दिल्यावर फडणवीस हे थांबवण्यासाठी आणि अगदी गडकरींसोबत मेनलँड चायनाच जेवण घेण्यास ही तयार झाले. सभा संपवून फडणवीस थेट पोहोचले सेनापती बापट रस्त्याच्या मेरिएट हॅाटेलला. ते पोहोचल्यावर थोड्याच वेळात गडकरींनी ही त्यांचे सगळे नियोजित कार्यक्रम आटोपले आणि दोघेही थेट पोहोचले रस्ता ओलांडून मेनलँड चायनाला. सुरक्षारक्षकांची थोडी धावपळ ही उडाली. पण मेनलँड चायनामध्ये गडकरी फडणवीसांचं जेवण झालं आणि दोघेही विमानतळावर पोहोचून एकाच विमानाने नागपूरला रवाना ही झाले आणि यंत्रणेचा जीवही भांड्यात पडला. सोबत पक्षाचा आणखी एक विमान बोलवण्याचा खर्च ही वाचला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : गडकरीचं फडणवीसांसोबत मेनलँड चायनात डिनर अन् भाजपाचा वाचला चार्टर्ड विमानाचा खर्च
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल