महाविकास आघाडीवर निशाणा...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात महायुती सरकारचे कौतुक करताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला. अमित शहा यांनी आपल्या भाषणात म्हटले की, हे संकल्प पत्र राज्यातील महान भूमीच्या सर्व लोकांचे आहे. गुलामीतून मुक्तीचं आंदोलन देखील या राज्यातून झाले. लोकांच्या आकांशाचे प्रतीक या संकल्प पत्रात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदा संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात आली. आमच्या संकल्पपत्रात मजबूत आणि सुरक्षित महाराष्ट्र कसा असेल याचा उल्लेख करण्यात आला आहे. आम्हाला तिसऱ्यांदा तुम्ही आम्हाला बहुमत द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
advertisement
उद्धव ठाकरेंवर डागली टीकेची तोफ...
2014 ला लोकांनी महायुतीला बहुमत दिले. त्यानंतर 2019 ला देखील महायुतीला बहुमत दिले पण काहींनी सत्तेसाठी अपमान करत या जनादेशाचा अपमान केला. मी उद्धव ठाकरेंना विचारतो की राहुल गांधी सावरकर यांच्या बद्दल चांगलं बोलू शकतील का? बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल काँग्रेसचा कुणी नेता दोन चांगले शब्द बोलेल का? असा सवाल शहा यांनी केला. ही आघाडी वैचारिकदृष्ट्या अंतर्विरोधाने भरली असल्याचे शहा यांनी नमूद केले. त्यांनी पुढे म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी कुठं बसावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण, ते कुठं बसले आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं. कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांसोबत बसलेत, राम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत विरोध करणाऱ्यांसोबत बसलेत. सावरकर यांचा अपमान करणाऱ्यासोबत तुम्ही बसला आहात असेही शहा यांनी म्हटले.
