काही दिवसांपूर्वीच महायुतीने आपला जाहीरनामा प्रकाशित केला होता. त्यानंतर. आता भाजपकडून आज, आपलं संकल्पपत्र, प्रकाशित करण्यात आले. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते संकल्पपत्र जाहीर करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप आहे. भाजपसाठी अथवा महायुतीसाठी संकल्पपत्र म्हणजे कागदाचे डॉक्युमेंट नसून एक पवित्र दस्ताऐवज आहे. आज दुपारी 12 वाजता एक स्थगिती पत्र जारी होणार आहे. अनेक प्रकल्पांवर त्यांनी स्थगिती दिली होती असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला. आज जनतेचा विश्वास भाजप, महायुतीवर आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
advertisement
भाजपच्या संकल्पपत्रात लोकांसाठी आहे तरी काय?
-
- वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये देण्याचे वचन
- सरकार स्थापनेनंतर व्हिजन महाराष्ट्र @2029 हे 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन
- अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15 हजार रुपये वेतन आणि विमा संरक्षण देणार
- 25 लाख रोजगार निर्मिती करणार
- महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन देणार
- लाडक्या बहिणींना २१०० रुपये
- शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार
- भावांतर योजना लागू होणार - हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यास हमी भावाने खरेदी करू फरकाचे पैसे शेतकऱ्यांना पैसे देणार
- आर्थिक सहाय्यतेच्या योजनेत १५०० रुपये मानधन २१०० रुपये करणार.
- जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यासाठी योजना...
- गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सौर उर्जेचा वापर करून वीज बिलात कपात करणार
- शेतकऱ्यांसाठी मूल्य साखळी निर्माण करणार
- ५० लाख लखपती दीदी तयार करणार
- विज्ञानामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर ठेवणार
- मेक इन महाराष्ट्र साठी प्रयत्न करणार
- फिनटेक व एआय मध्ये मोठी गुंतवणूक करणार
सविस्तर बातमी थोड्याच वेळेत..
