विरारच्या एका हॉटेलमध्ये क्षितीज ठाकुरांनी कार्यकर्त्यांसह घेरून पैसे वाटल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे देखील झाले आहेत. आम्ही विरोधकांच्या हॉटेलमध्ये जाऊन पैसे वाटू, इतके तर भाजपवाले आता मूर्ख राहिले नाहीत आणि माझ्याकडे एक पैसा सापडला नाही, असे विनोद तावडे यांनी म्हटले. त्यावर बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी जोरदार पलटवार केला आहे.
advertisement
हितेंद्र ठाकूर यांनी काय म्हटले?
विवांत हॉटेल ठाकुर यांचे असल्यामुळे त्यांनी गोंधळ घालायचे नियोजन केले होते असं वक्तव्य तावडे यांनी केले होते. त्यावर हितेंद्र ठाकूर यांनी उत्तर देत म्हटले की, ते हॉटेल तावडेंनीच माझ्या नावावर करावे. काल जे भिजलेल्या कोंबडी सारखे हॉटेल मध्ये बसून होते, त्यांना मुंबईला गेल्यावर कंठ फुटला असल्याचे ठाकूर यांनी म्हटले. खोटं बोलायचं आणि ते रेटून बोलायचं ही त्यांची सवय असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले.
नेमकं काय झालं?
विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे आले होते. याबातची माहिती नालासोपारा विधानसभेचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह हॉटेल गाठले. यावेळी एका कार्यकर्त्यांने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली त्यामध्ये पैसै भरलेले लिफाफे सापडले होते. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी हे लिफाफे उघडून पैसे दाखवले.
