पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, ‘जे लोक हिंदू खतरे में म्हणतात, त्यांना मराठ्यांची आरक्षण लढ्यातील एकजूट दिसत नाही का, असा प्रश्न केला. ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ ही दोन्ही घोषवाक्ये कोणासाठी आहेत असे विचारताना मराठा ही हिंदूमधील मोठी जात आहे. तेव्हा आम्ही आमचे बघून घेऊ. आम्ही शिवछत्रपतींचे हिंदूत्व मानतो, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
advertisement
मुस्लिमांविरोधात मराठा समाजाच्या हातात लाठ्या देऊन त्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.
मराठा समाजाकडून पाडापाडी होणार...
मराठा समाजामध्ये मतदानाबाबत कोणताही संभ्रम नसून लोकसभेत सांगितले तेच विधानसभेत होणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. मुस्लीम, दलित व्यापाऱ्यांच्या मनात सत्ताधाऱ्यांविषयी असंतोष असून मतदानांतून व्यक्त होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
निवडणुकीतून माघार
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि इतर समाजातील उमेदवारीसह आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे म्हटले होते. मनोज जरांगे यांनी काही इतर समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न केला. मराठा-दलित-मुस्लिम या मतांच्या फॉर्म्युल्यावर निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवण्यात आली होती. मात्र, जरांगे यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्ष्रण विरोधकांना निवडणुकीत पाडण्याचे आवाहन केले.
