TRENDING:

Mumbai Elections Results Worli : वरळीत आदित्यला नाममात्र आघाडी, माहीममध्ये अमितला किती मते?

Last Updated:

Mumbai Elections Results Mahim Worli : वरळी आणि माहीम या दोन्ही मतदारसंघात चुरशीची लढाई आहे. वरळीत आदित्य ठाकरेंना नाममात्र आघाडी आहे. तर, अमित ठाकरेदेखील चांगली लढत देत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :   मुंबईमध्ये हायव्होलटेज लढती पैकी असलेल्या वरळी आणि माहीम मतदारसंघातील सुरुवातीचा कल समोर आला आहे. वरळीतून शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि माहीममध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोन मतदारसंघातील सुरुवातीचा कल समोर आसा आहे. वरळी आणि माहीम या दोन्ही मतदारसंघात चुरशीची लढाई आहे. वरळीत आदित्य ठाकरेंना नाममात्र आघाडी आहे. तर, अमित ठाकरेदेखील चांगली लढत देत आहेत.
Mumbai Elections Results Mahim Worli
Mumbai Elections Results Mahim Worli
advertisement

मतमोजणीच्या पहिल्या कलामध्ये पोस्टल मतदानात महायुती आघाडीवर आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर महायुती जागांवर आणि महाविकास आघाडीत चुरस असल्याचे दिसून येत आहे. मतमोजणीस सुरुवात झाली असून प्रत्येक फेरीनिहाय कल बदलणार आहे. त्यामुळे अंतिम चित्र स्पष्ट होण्यास वेळ लागणार आहे.

वरळीत आदित्य ठाकरे यांना पहिल्या फेरीत 4 हजार 231मते मिळाली. तर, शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांना 3 हजार 736 मते मिळाली. मनसेचे संदीप देशपांडे यांना 2 हजार 3991 मते मिळाली. पहिल्या फेरीत आदित्य ठाकरे 495 मतांनी आघाडीवर आहेत.

advertisement

माहीममध्ये काय?

माहीम मतदारसंघातही चुरशीची लढत सुरू आहे. पोस्टल मतदानात आघाडीवर असलेले मनसेचे अमित ठाकरे हे सध्या पिछाडीवर आहेत. विद्यमान आमदार शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर हे तिसऱ्या स्थानी असून महेश सावंत आघाडीवर आहे. मनसेचे अमित ठाकरे यांना 2156 मते मिळाली. तर, शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांना 2142 मते मिळाली आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंतर यांना पहिल्या फेरीत 2270 मते मिळाली आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात मोठी घसरण, शनिवारी सोयाबीन आणि कांद्याला किती मिळाला दर?
सर्व पहा

यंदाची विधानसभेची निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. पहिल्यांदाच विधासभा निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी यांनी निवडणुका लढवल्या. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक धनुष्यबाण चिन्हाविना लढले आहेत तर शरद पवार घड्याळ्याशिवाय. पक्षापक्षांतली लढाई, नेत्यानेत्यंमधली लढाई, नात्यागोत्यातली लढाई या निवडणुकीत सर्वात चर्चात राहिली. खरी शिवसेना कुणाची, खरी राष्ट्रवादी कुणाची, राज्यात सत्ता कुणाची? याचे उत्तर आज मिळणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Elections Results Worli : वरळीत आदित्यला नाममात्र आघाडी, माहीममध्ये अमितला किती मते?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल