मतमोजणीच्या पहिल्या कलामध्ये पोस्टल मतदानात महायुती आघाडीवर आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर महायुती जागांवर आणि महाविकास आघाडीत चुरस असल्याचे दिसून येत आहे. मतमोजणीस सुरुवात झाली असून प्रत्येक फेरीनिहाय कल बदलणार आहे. त्यामुळे अंतिम चित्र स्पष्ट होण्यास वेळ लागणार आहे.
यंदाची विधानसभेची निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. पहिल्यांदाच विधासभा निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी यांनी निवडणुका लढवल्या. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक धनुष्यबाण चिन्हाविना लढले आहेत तर शरद पवार घड्याळ्याशिवाय. पक्षापक्षांतली लढाई, नेत्यानेत्यंमधली लढाई, नात्यागोत्यातली लढाई या निवडणुकीत सर्वात चर्चात राहिली. खरी शिवसेना कुणाची, खरी राष्ट्रवादी कुणाची, राज्यात सत्ता कुणाची? याचे उत्तर आज मिळणार आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2024 8:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Result 2024 : मतमोजणीला सुरुवात, पहिला कल समोर, महायुती सुस्साट, मविआ पिछाडीवर
