विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान नागपूरमध्ये बोलताना त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, शरद पवारांची ही शेवटची निवडणूक आहे, असे कोणता शत्रू म्हणतो असा सवाल त्यांनी केला. असं कोणीच कोणासोबत बोलत नाही. हे धक्कादायक वक्तव्य आहे. शरद पवार यांनी गेल्या सहा दशकाच्या राजकारणात नेहमी विकासाच्या मुद्यावर मते मागितली आहेत. त्यांनी कोणताही भावनिकतेचा आधार घेऊन त्यांनी मते मागितली नसल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
advertisement
त्यांनी पुढे म्हटले की, शरद पवारांचे आयुष्य असो किंवा इतर व्यक्ती असो, मी मोदीजींची विरोधक असली तरी त्यांनी 100 वर्ष जगावं अशी आमची इच्छा आहे. प्रत्येकाने दीर्घ आयुष्य आणि आनंदी जगावं असेच वाटत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
अदानींसोबत बैठक झाली?
अजित पवार यांनी एका मुलाखतीत बोलताना 5 वर्षापूर्वी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत शरद पवार, अमित शाह आणि अदानी यांची बैठक झाली असल्याचा दावा केला. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, मिटिंग झाली का नाही याचा उत्तर तुम्हाला अजित पवारांना विचारावा लागेल. ही अशी मीटिंग झाली की नाही हे मला माहिती नाही, पहाटेच्या शपथविधी मला काहीच माहिती नव्हती असेही सुप्रिया सुळेंनी सांगितले.
