लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भातील मतदाराकडून मोठ्या अपेक्षा असताना भाजपला, महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्या तुलनेत मविआ मध्ये काँग्रेसला आपला गड पुन्हा काबिज करण्यास बऱ्यापैकी यश आले. त्यामुळे ढासळलेला गड विधानसभा निवडणुकीत परत मिळविण्यासाठी भाजप ने कंबर कसली होती.
विधानसभा निवडणुकीत युती आघाडीने मतदारांच्या भावनाना हात घालून मन जिंकण्याचा प्रयत्न केला ज्यात भाजपकडून 'एक है तो सेफ है', 'कटंगे तो बटेंगे' सारख्या घोषणा भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी दिल्या. मात्र, प्रत्यक्षात मात्र देवेंद्र फडणवीस यांची 'लाडक्या बहिणीचा देवा भाऊ' ही टॅग लाईन जनतेच्या पसंतीस पडली. शेतीचे झालेले प्रचंड नुकसान प्रामुख्याने सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी याचा सत्ताधारी यांच्यावर असलेला रोष पाहून सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना MSP शिवाय बोनस देण्याची घोषणा केली.
advertisement
महाविकास आघाडीने सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिक भर ठेवला. त्याशिवायस रोजगार, आरोग्य सेवा यांचाही मुद्दाही प्रचारात अधोरेखित केला होता. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने सोयाबीनला 7000 रुपयांचा दर देण्याची घोषणा केली. तर, कापसाला देखील योग्य दर देणार असल्याचे जाहीर केले. मविआच्या प्रचारात शेतकरी, युवक, महिला केंद्रस्थानी होत्या.
मतदानासाठी भाजप महायुतीकडून जोर...
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महायुती-भाजपने चांगलाच जोर लावला. लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या कमी टक्केवारीचा फटका बसला होता. ही बाब लक्षात घेऊन भाजपने आपल्या कोअर मतदारांकडे लक्ष केंद्रीत केले आणि मतदानासाठी प्रयत्न केले. त्याशिवाय, हिंदुत्ववादी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी मतदारांना आवाहन करणारी मोहीम राबवण्यात आली. त्याच्या परिणामी ही मतांची टक्केवारी वाढली असल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे विरोधक महाविकास आघाडीनेदेखील आपल्या मतदारांसाठी जोर लावला होता. त्याच्या परिणामी मतांची टक्केवारी वाढली असल्याचे बोलले जात आहे.
वाढलेलं मतदान सरकारविरोधात, काँग्रेसचा दावा
वाढलेलं मतदान हे सरकार विरोधात असून शेतकऱ्यांनी आपला संताप या मतदानातून व्यक्त केलेला आहे, याचा फायदा मविआला होईल असा विश्वास काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्रात संघ विचार हिंदू व जिहाद हे सारखे विषय मतदारांना आवडत नाही, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे त्यामुळे या गोष्टींचा मतदान वाढीवर कुठलाही परिणाम झाला नसेल असेही त्यांनी म्हटले.
